शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ही पाच ठिकाणं राहण्याचा खर्च ठेवतात बजेटमध्ये. स्वस्तात मस्त ट्रीपसाठी हे पर्याय एकदम बेस्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:50 IST

फिरायला गेल्यावर सगळ्यांत जास्त खर्च होतो तो महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याचा. पण याच खर्चाला कात्री लागली तर ट्रीपचं बजेटही कमी होतं. अशी काही ठिकाणं आहेत जिथे तीन दिवसांची ट्रीप अगदी माफक बजेटमध्येही होवू शकते!

ठळक मुद्दे* झाशीपासून 16 किमी अंतरावर मध्यप्रदेशमधील ओरछा. ओरछामध्ये 2 रात्री, 3 दिवसांचा मुक्काम अगदी चांगल्या हॉटेलमध्ये करायचं ठरवलंत तरी खर्च अवघा पाच हजाराच्या घरातच येतो.* डलहौसी भारतातल्या सर्वांत पसंतीच्या टुरिस्ट स्पॉटपैकी हा एक स्पॉट आहे. शिवाय इथे 2 दिवस,3 रात्रींच्या मुक्कामाची सोय एखाद्या हॉटेलचं पॅकेज घेतल्यास अवघ्या 5 हजार रूपयांमध्येच होते.* पर्यावरणप्रेमी किंवा निसर्गसौंदर्याचे भोक्ते असाल तर उत्तराखंडमधल्या ‘व्हॅली आॅफ फ्लॉवर’सारखं दुसरं ठिकाण नाही. अवघ्या साडेतीन हजार रूपयांत इथे 2 रात्री,3दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.

- अमृता कदम

हौसेला मोल नसतं असं म्हणतात. फिरायची हौस पूर्ण करण्यासाठी आपला खिसा गरम असायला हवा असा एक सर्वसाधारण समज आहे. पण फिरण्याची तुमची हौस आणि इच्छा तीव्र असेल तर ही गोष्ट तुमच्या मार्गात अडथळा नाही बनणार. फिरायला गेल्यावर सगळ्यांत जास्त खर्च होतो तो महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याचा. पण याच खर्चाला कात्री लागली तर ट्रीपचं बजेटही कमी होतं. म्हणूनच अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घ्या जिथे तुम्ही तीन दिवसांची ट्रीप अगदी माफक बजेटमध्येही करु शकाल. 

 

1. ओरछा, मध्यप्रदेश

झाशीपासून 16 किमी अंतरावर मध्यप्रदेशचा ओरछा हा परिसर पूर्णपणे पर्वतांनी व्यापलेला आहे. अत्यंत प्राचीन अशी मंदिरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. शिवाय या जागेचं सौंदर्य सर्वात जास्त खुलतं ते पावसाळ्यात. इथली पावसाळी सकाळ अनुभवणं हा अगदी विलक्षण अनुभव आहे. ओरछामध्ये 2 रात्री, 3 दिवसांचा मुक्काम अगदी चांगल्या हॉटेलमध्ये करायचं ठरवलंत तरी खर्च अवघा पाच हजाराच्या घरातच येतो. 

 

2. डलहौसी ( हिमाचल प्रदेश)

देवभूमी म्हणून ओळख असलेल्या हिमाचल प्रदेशातलं इंग्रजांनी वसवलेलं हे हिल स्टेशन. हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणाला चहुबाजूंनी निसर्गसौंदर्याची देणगी लाभली आहे. शहर वसवण्यासाठी जागा निवडताना इंग्रजांची सौंदर्यदृष्टी किती छान होती याचा प्रत्यय तुम्हाला इथे आल्यावर होतो. भारतातल्या सर्वांत पसंतीच्या टुरिस्ट स्पॉटपैकी हा एक आहे. शिवाय इथे 2 दिवस,3 रात्रींच्या मुक्कामाची सोय एखाद्या हॉटेलचं पॅकेज घेतल्यास अवघ्या 5 हजार रूपयांमधेच होते. 

3. माऊंट अबू ( राजस्थान)

राजस्थानमधल्या रखरखत्या वाळंवटी प्रदेशातलं हे एकमेव हिल स्टेशन म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. निसर्गसौंदर्यासोबतच इथे जैनांची प्रसिद्ध अशी दिलवाडा मंदिरंही आहेत. पर्यटकांचा कायम ओढा असलेल्या या ठिकाणी हॉटेल्सही खूप महागडी असतील असा विचार जर तुम्ही करत असाल तर थांबा. कारण इथेसुद्धा पाच हजार रूपयांमध्ये 3 दिवस 2 रात्रींचं पॅकेज मिळतं

 

 

4. व्हॅली आॅफ फ्लॉवर( उत्तराखंड)

पर्यावरणप्रेमी किंवा निसर्गसौंदर्याचे भोक्ते असाल तर उत्तराखंडमधल्या ‘व्हॅली आॅफ फ्लॉवर’सारखं दुसरं ठिकाण नाही. एकाच ठिकाणी इतक्या प्रकारची फुलं पाहून तुम्ही थक्क व्हाल. वाइल्ड रोज, डेलिया, सैक्सिफेज, ट्युलिप या फुलांच्या अनेक जाती, त्यांचे विविध रंग पाहताना तुम्ही स्वत:ला विसरून जाल. अवघ्या साडेतीन हजार रूपयांत इथे 2 रात्री,3दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत. 

5. शिलॉंग (मेघालय)

ईशान्य भारताला निसर्गसौंदर्याचा अद्भुत खजिना लाभलेला आहे. त्यातही शिलॉंगला ‘पूर्वाैत्तरचं स्कॉटलण्ड’ असं म्हटलं जातं. महाकाय पर्वंतासोबतच घनदाट जंगलाची सोबत लाभलेला हा सगळा परिसर बजेट ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. आणि हो, तुम्ही जर रॉक म्युझिकचे चाहते असाल तर तुम्ही एकदा तरी शिलाँगला जायलाच हवं. कारण अनेकांना माहित नाही की या छोट्याशा शहराला ‘रॉक कॅपिटल’ म्हणूनही ओळखलं जातं.त्यामुळे ट्रीप प्लॅन करताना बजेटची चिंता असेल तर या ठिकाणांचा विचार जरूर करा. तुमच्या ट्रीपच्या एकूण खर्चात नक्कीच बर्यापैकी बचत होऊ शकते.