किल्ले आणि महालं बघण्याची पसंती असेल तर राजस्थान आणि महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशात येऊनही तुम्ही भारताची संस्कृती आणि वैभव जाणून घेण्यासाठी तुम्ही ग्वाल्हेर किल्ल्याची भव्यताही बघू शकता.
गोपांचल पर्वतावर असलेला ग्वाल्हेर किल्ल्या लोकप्रिय आहे. सोबतच हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. ८व्या शतकात तयार करण्यात आलेला हा किल्ला येथील संस्कृती आणि वैभवाची ओळख आहे. यावर मुघलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी राज्य केलं. हा किल्ला दोन भागांमध्ये विभागला आहे. एक आहे मान मंदिर पॅलेस आणि दुसरा आङे गुजली पॅलेस. याला आता म्युझिअमचं रूप देण्यात आलं आहे.
किल्ल्याची बनावट
विशाल ग्लालियर किल्ला बलुआ दगडाच्या डोंगरावर उभारला आहे आणि १०० मीटर उंचीवर आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला ग्वाल्हेर गेट आणि दुसरा उरवाई गेट. किल्ल्याच्या भींती सरळ उंच असून बाहेरील भींती २ मीटर लांब आणि रूंदी १ किमी ते २०० मीटरपर्यंत आहे. डोंगरापर्यंत जाण्यासाठी तयार रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं.
किल्ल्याचं मुख्य द्वार हत्ती फूल नावाने ओळखलं जातं. किल्ल्याच्या स्तंभावर ड्रॅगनची कलाकृतीही आहे. तसेच किल्ल्यावर गुरू गोविंद यांच्या स्मृतीत एक गुरूद्वाराही तयार केला आहे. सोबतच जुन्या शैलीमध्ये मानसिंग महालही उभा आहे. त्यासोबतच सहस्त्रबाहू मंदिर, चतुर्भुज मंदिर, तेली मंदिर १४ आणि १४व्या शतकातील गुहा सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. तसेच जहांगीर महाल, कर्ण महाल, विक्रम महाल आणि शाहजहां महालही सुंदर आहे. या किल्ल्याचं निर्माण ८व्या शतकात राजा मान सिंग तोमर यांनी केलं होतं.
कधी जाल?
हेरिटेज साइट असल्याकारणाने हा किल्ला बघण्यासाठी पर्यटकांनी नेहमीच मोठी गर्दी असते. पण नोव्हेंबर ते मार्च महिना हा कालावधी किल्ला फिरण्यासाठी बेस्ट कालावधी मानला जातो. कारण यादरम्यान फार थंडीही नसते आणि फार गरमी सुद्धा नसते. त्यामुळे तुम्ही आरामात किल्ल्याची सफर करू शकता.
कसे जाल?
शहरापासून ८ किमी अंतरावर ग्वाल्हेर एअरपोर्ट आहे. इथे तुम्हाला सहजपणे टॅक्सी आणि बसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच दिल्ली, मुंबई, अजमेर, जबलपूर, भोपाळ, वाराणसी आणि बंगळुरूसारख्या शहरातून ग्वाल्हेर शहर रेल्वेने जोडलेलं आहे. तसेच तुम्ही रस्ते मार्गेही जाऊ शकता.