शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

प्रवासाला जाताय, की दुसरीकडे कायमचं राहायला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 16:24 IST

मग इतकं सामान आणि महत्त्वाच्या गोष्टी सोबत कशासाठी?

ठळक मुद्देपरदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे?तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच सोबत घ्या.आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.

- मयूर पठाडे

कुठेही जायचं म्हटलं, प्रवास करायचा म्हटलं की दोन पद्धतीचे लोक हमखास आपल्या नजरेला पडतात. काही जण अगदी काहीही तयारी न करता, इतक्या ऐनवेळी जायचं ठरवतात, की बºयाच महत्त्वाच्या गोष्टी करायच्या एकतर राहून तरी जातात नाहीतर ते विसरून तरी जातात. काही जण इतकी तयारी करतात, इतकं सामान, इतक्या गोष्टी आपल्यासोबत घेतात, की जणू काही ते तिथे कायमचं राहायला जाताहेत!या दोन्हीही गोष्टींचा अतिरेक नको. पण काही गोष्टींची काळजी मात्र घेतलीच पाहिजे. ऐनवेळी उपयोगी पडेल म्हणून अनेक जण नको असलेल्या गोष्टीही आपल्या सोबत घेतात. त्यांचं अनावश्यक ओझं तर आपल्याला होतंच, पण काही वेळा त्यातील एखादी जरी महत्त्वाची गोष्ट गहाळ झाली, चोरीला गेली तर नंतर पस्तावा करण्याची पाळी येते. कारण प्रवासात आपलं बॅगेज गहाळ होण्यापासून, ते चोरी जाण्यापर्यंत आणि काही वेळा घाईत आपणच ते कुठे तरी विसरण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवासात कोणत्याही अनावश्यक गोष्टींचं ओझं आपण टाळलंच पाहिजे.समजा तुम्ही परदेश प्रवासाला जाता आहात, पासपोर्ट घेतला, तेवढं पुरेसं आहे की! आता आणखी आपलं बर्थ सर्टिफिकेट, तेही ओरिजिनल कशासाठी सोबत पाहिजे? पण काही जण अशा चुका करतात.समजा तुमच्याकडे बरेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत. मग त्यातलं एखादंच घ्या की. सगळेच्या सगळे सोबत घेऊन काय उपयोग? पुन्हा ते सांभाळायची कटकट.समजा तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी घेतल्याच असतील सोबत, तर त्याची एक व्यवस्थित लिस्ट तयार करा.आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसचे रेकॉर्ड व्यवस्थित चेक करीत राहा. कोणतीही संशयास्पद नोंद त्यावर आढळली तर लगेच ते कार्ड ब्लॉक करा.घरातून बाहेर पडताना आपल्या घराचीही पुरेशी सुरक्षा तुम्ही घेतली आहे का, याचीही खात्री करून घ्या.आणखी एक, पण अतिशय महत्त्वाचं..आपल्या घराच्या बाहेर, आपल्या बिल्डिंगच्या खाली आपली जी पत्रपेटी लावलेली आहे, ती भरून, ओसंडून वाहणार नाही याची अवश्य काळजी घ्या. आपली पत्रपेटी ओसंडून वाहतेय, म्हणजे आपण घरी नाहीत, हे अगदी सहजपणे समजण्याची ती पहिली ओळख आहे. त्यामुळे आपण बाहेरगावी, प्रवासाला जाणार असल्यास आपली पत्रपेटी तुंबणार नाही, याची काळजी अवश्य घ्या. शेजारच्यांनाही आपली पत्रं ताब्यात घ्यायला सांगता येईल.