शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

यंदाच्या हिवाळ्यात अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा लुटायचीय मग ही 10 ठिकाणं आहेत ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 17:07 IST

फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी हिवाळ्यासारखा दुसरा सिझन नाही. या दोन्हींची मजा एकत्र लुटता येईल अशी दहा ठिकाणं आपल्या देशात आहे. यापैकी एक निवडा आणि यंदाचा हिवाळा एन्जॉय करा.

ठळक मुद्दे* तुमची हिवाळ्यातली सुट्टी अविस्मरणीय बनवायची असेल तर गुलमर्ग सारखी जागा नाही. काश्मीरमधलं हे टुमदार गाव स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे.* जगातल्या सर्वोत्तम सर्फिंग गाइड लिस्टमध्ये तामिळनाडूमधल्या मानापैडचा समावेश केला गेला आहे.* रोपारमधल्या काकिर रिसॉर्टमध्ये तुम्हाला फ्लाइंग फॉक्स, क्वार्ड बाइकिंग, रॅपलिंग, पेंट बॉल, हॉर्स रायडिंग नाइट सफारी, जोरबिंग, वॉटर बॉल , ट्रॅम्पोलिनची मजा घेता येऊ शकते.

- अमृता कदमफिरायला जाण्यासाठी थंडीसारखा मस्त सीझन दुसरा कोणताही नाही. या काळात किनारी प्रदेशांपासून बर्फाच्छादित पर्वतरांगांपर्यंत आणि वाळंवटी प्रदेशापासून हिरव्यागार जंगलांपर्यंत कुठेही फिरायला जाऊ शकता. यंदाच्या थंडीत फिरायला गेल्यावर काहीतरी वेगळं करण्याचा विचार असेल तर या दहा ठिकाणांचा पर्याय नक्की विचारात घ्या. कारण इथे तुम्हाला खास हिवाळी एडव्हेंचर स्पोर्टसची मजा घेता येऊ शकते.1. कूर्गकर्नाटकातल्या या हिल स्टेशनची ओळखच मुळी भारताचं स्कॉटलंड अशी आहे. हिरवाईनं नटलेला हा परिसर तुम्हाला शांततेची अनुभूती तर देतोच पण त्याबरोबर जंगलामधलं कॅम्पिंग, गन फायरिंग, फोटोग्राफी अशा वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटींचाही आनंद घेता येतो. तळ-कावेरी हे कावेरी नदीचं उगमस्थान इथं आहे, त्यामुळे रिव्हर राफ्टिंग करण्याची मजाही तुम्ही इथे लुटू शकता.

 

2. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

हिमालयाच्या कुशीत वसलेलं उत्तराखंड त्याच्या शांत सौंदर्यामुळी देवभूमी म्हणूनच ओळखलं जातं. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क केवळ वाघांसाठी प्रसिद्ध नाही तर रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, जॉर्बिंग, बर्मा ब्रिज हे खेळ खेळून मन रमवू शकता. जिम कॉर्बेटला जाण्यासाठी दिल्लीवरून तुम्ही बायरोड जाऊ शकता. कारण हा प्रवासही एखाद्या अ‍ॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही.

 

3. रिपियन रिसॉर्ट

रिपरियन रिसॉर्ट गुजरातमधल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जीप लाइन, हाइरोप, लो रोप, ग्राउण्ड अ‍ॅडव्हेन्चर, व्हॅली क्र ॉसिंग, रिव्हर क्र ॉसिंग, माउंटन बाइकिंग अशा वेगवेगळ्या थ्रीलिंग खेळांचा आनंद घेता येतो. मित्रांच्या ग्रूपसोबत जाण्यासाठी ही एकदम योग्य जागा आहे. 

4. पाइन पॅलेस रिसॉर्ट

तुमची हिवाळ्यातली सुट्टी अविस्मरणीय बनवायची असेल तर गुलमर्ग सारखी जागा नाही. काश्मीरमधलं हे टुमदार गाव स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहे. पण स्कीइंगसोबतच केबल कार, अल्पाइन, स्नो बोर्डिंग या गोष्टीही इथं करता येण्यासारख्या आहेत. स्कीइंगमुळं इथं जाण्याचा सर्वोत्तम काळ हा थंडीचाच असतो.

 

5. अंदमान आणि निकोबार

हिल स्टेशन्स आणि पर्वतरांगाबरोबरच थंडीत तुम्ही अंदमान आणि निकोबार बेटांनाही भेट देऊ शकता. इथलं मुंजोह ओशिएन रिसॉर्ट अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टससाठी नावाजलेलं आहे. अंदमान निकोबारच्या बीच नंबर 5 हॅवलॉकवर हे रिसॉर्ट आहे. स्कूबा डायिव्हंग, स्नोर्कलिंह, डीप सी डायव्हिंगसारखे वेगवेगळे खेळ तुमच्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करतात. इथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत येणं जास्त चांगलं. कारण मुलांसाठी ही जागा एकदम उत्तम.

6. रोपार

रोपारमधल्या काकिर रिसॉर्टमध्ये तुम्हाला फ्लाइंग फॉक्स, क्वार्ड बाइकिंग, रॅपलिंग, पेंट बॉल, हॉर्स रायडिंग नाइट सफारी, जोरबिंग, वॉटर बॉल , ट्रॅम्पोलिनची मजा घेता येऊ शकते. शिवाय कृषी पर्यटनाचाही आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. घोडेस्वारी, रेडे जुंपलेल्या गाडीतून फेरफटका तसंच ट्रॅक्टरमधून सफर अशा आपल्या रोजच्या आयुष्यात न केल्या जाणा-या गोष्टीही तुम्हाला करता येतात.

 

 

7. ब्रह्मपुत्र फॉरेस्ट रिसॉर्ट

आसाममधलं ब्रह्मपुत्र फॉरेस्ट रिसॉर्ट सदाहरित जंगल आणि वाहण-या जंगलांनी वेढलेल्या परिसरात वसलेलं आहे. इथे हँग ग्लायडिंगसोबतच एंगलिंग, रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, पॅरा सेलिंग, गोल्फ असे खेळही खेळू शकता.

8. मानापैडजगातल्या सर्वोत्तम सर्फिंग गाइड लिस्टमध्ये तामिळनाडूमधल्या मानापैडचा समावेश केला गेला आहे. सर्फिंग, नौकाविहार, रात्री खेकड्यांची शिकार, वेक बोर्डिंग, स्कूबा डायव्हिंग, फिशिंगच्या आनंदाबरोबरच तुम्ही ओपन सी बोट रायडिंग आणि डॉल्फिन दर्शनाची मजाही इथे घेता येते.

9. अरवली टेण्ट रिसॉर्ट

राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये अरवली टेण्ट रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट दूध तलावाजवळच्या समोर बाग इथं वसलेलं आहे. इथल्या तंबूंमध्ये राहण्याची वेगळीच मजा आहे. इथे ट्रेकिंग आणि सफारीचा मनमुराद आनंद लुटता येतो. त्यामुळेच मोठ्या संख्येनं पर्यटक अरवली टेण्ट रिसॉर्टला पसंती देतात.

10. अर्बन व्हॅली

बंंगळूरूसारख्या शहरातच लोकांना अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टसची मजा मिळावी या हेतूनं अर्बन व्हॅली रिसॉर्टची सुरूवात झाली. हे रिसॉर्ट बेंगळूरूमधल्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या जवळच आहे. कायनिंग, पेंट बॉल, एटीवी बाइकवर मनसोक्त खेळून मग इथल्या तलावाच्या किना-यावर शांतपणे बसण्यात एक वेगळाच आनंद आहे.तुमच्याकडे असलेला वेळ आणि प्रवासाच्या साधनांची कनेक्टिव्हिटी यांचा विचार करून तुम्ही या ठिकाणांपैकी एखादं ठिकाण तुमच्या यंदाच्या हिवाळी ट्रीपसाठी फायनल करु शकता.