शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तारुण्याच्या रसरशीत ऊर्जेसाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:32 IST

निसर्गाच्या कुशीत शिरा आणि करा ‘काया’पालट..

ठळक मुद्देएनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.रोजच्या व्यापातून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल.. निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल..

- मयूर पठाडेका येतो आपल्याला ताण? का येतो कधीकधी पच्रंड वैताग? चिडचिड होते, एखाद्यावर ओरडावंसं वाटतं, काही प्रसंगी तर त्याला बुकलून काढावंसं वाटतं..कशामुळे होतं हे सारं?..त्यातली प्राथमिक आणि आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात जर पुरेशी एनर्जी नसली, कामाच्या ओझ्यानं किंवा इतर काही गोष्टींनी आपला पेशन्स संपलेला असला, काही करण्याचा उत्साहच आपल्यात नसला तर आपली चिडचिड व्हायला लागते. टेन्शन येण्यामागे एनर्जी नसणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे.मग कशी वाढवायची ही एनर्जी? कुठून आणायचा उत्साह?बºयाचदा ही एनर्जी आणि उत्साह खाण्यापिण्यातून आणि एनर्जी ड्रिंक्समधून मिळत नाहीच. त्यासाठी त्या वातावरणातून बाहेर पडायला हवं असतं. आपल्या कामातून आपण आता ब्रेक घ्यायला हवा, काहीतरी वेगळं करायला हवं हे आपल्याला सांगणारा तो संकेतच असतो. शरीराचा, मनाचा हा संकेत आपण पाळायला हवा.त्यासाठी कामातून ब्रेक घेणं म्हणजेच काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणं.. यासारखा दुसरा रामबाण इलाज नाही. आहे त्या गोष्टी तर आपल्याला सोडता येत नाहीत, पण थोड्या काळासाठी त्यापासून थोडं दूर गेलं तर नव्या उत्साहानं त्याच गोष्टी आपण पुन्हा हाती घेऊ शकतो.आपली गेलेली एनर्जी परत मिळवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासारखा दुसरा उपाय नाही.किती गोष्टींनी आपण रोज त्रस्त असतो?.. कारणं वेगवेगळी असतील, पण हाच अनुभव आपण वेगवेगळ्या वेळी घेत असतो की नाही?.. भीती, चिंता, संताप, टेन्शन्स, प्रॉब्लेम्स, वादविवाद, कामांचे डोंगर..कोणालाच ते चुकत नाहीत.. पण एकदा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तर बघा.. तुम्हाला काय काय मिळतं ते..निसर्ग चहूअंगानं अनेक गोष्टी तुमच्यावर उधळून देईल.. तुमची गेलेली ऊर्जा तुम्हाला परत मिळेल, कॉन्फिडन्स वाढेल, मुड चांगला होईल, एवढंच नाही, संशोधकांनी तर सिद्धच केलंय, तुम्ही जर वारंवार निसर्गाच्या सान्निध्यात जात असाल तर तुमची कांतीही तजेलदार होईल, तुम्ही अधिक तरुण तर व्हालच, वार्धक्य तुमच्या जवळ येण्यालाही कचरेल..