शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हे डेस्टीनेशन वेडिंग्ज तुम्हाला माहिती आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:32 IST

केवळ अनुष्कानेच नाही तर इतर बॉलिवूड स्टार्सनेही लग्नासाठी काही खास देश निवडून तिथे लग्न केले होते. हे स्टार्स नेमके कोण आणि त्यांनी लग्नासाठी निवडलेले देश कोणते ही निवड त्यांनी का केली ही माहितीही अतिशय रंजक आहे. अर्थात कोणाला डेस्टिनेशन वेडींग करायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्तही ठरेल.

ठळक मुद्दे* अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा विवाहही इटलीमध्येच संपन्न झालेला होता.* जॉन अब्राहमने आपली खास मैत्रिण प्रिया रुंचाल हिच्यासोबत लॉस एंजेलिसमध्येच विवाह केला.* सेलिना जेटलीनं आॅस्ट्रिया या युरोपियन देशात लग्न केलं.

- अमृता कदमगेले काही दिवस विराट आणि अनुष्काच्या डेस्टिनेशन वेडिंगची चर्चा सर्वत्र होते आहे. जितकी चर्चा त्यांच्या लग्नाची झाली तितकीच त्यांनी लग्नासाठी जे स्थळ निवडलं त्याचीही झाली. इटलीमधल्या एका अत्यंत शांत, खासगी, निसर्गानं नटलेल्या टस्कनी या ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. केवळ अनुष्कानेच नाही तर इतर बॉलिवूड स्टार्सनेही लग्नासाठी काही खास देश निवडून तिथे लग्न केले होते. हे स्टार्स नेमके कोण आणि त्यांनी लग्नासाठी निवडलेले देश कोणते ही निवड त्यांनी का केली ही माहितीही अतिशय रंजक आहे. अर्थात कोणाला डेस्टिनेशन वेडींग करायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्तही ठरेल.

 

माधुरी दीक्षित आणि न्यूयार्क(अमेरिका)

माधुरी दीक्षित हिचं लग्न हा एकेकाळी गाजलेला विषय होता. तिनं एनआरआय नवरा निवडल्यानंतर माध्यमांचा ससेमिरा चुकवत अतिशय साध्या पद्धतीनं हे लग्न अमेरिकेत पार पडलेलं होतं. डॉक्टर नेने हे अमेरिकेतच स्थायिक असल्यानं ‘वरपक्षा’च्या घरालाच लग्नासाठी पसंती देण्यात आली होती.

राणी मुखर्जी आणि इटली

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा विवाहही इटलीमध्येच संपन्न झालेला होता. यशराज बॅनर्सच्या चित्रपटात दिसणा-या बहारदार लोकेशन्सनं चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेण्ड  आणला. त्याचाच वारसदार असणा-या आदित्य चोप्राने आपल्या लग्नासाठीही असेच लोकेशन निवडले.

जॉन अब्राहम आणि लॉस एंजेलिस (अमेरिका)

जॉन अब्राहमनं मॉडेल म्हणून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हाच त्यानं हजारो तरु णींच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. जॉनने आपली खास मैत्रिण प्रिया रुंचाल हिच्यासोबत लॉस एंजेलिसमध्येच विवाह केला.

मनीषा कोईराला आणि काठमांडू‘नेपाळी ब्युटी’ नावानं प्रसिद्ध असलेली मनीषा कोईराला हिनं अनेक वर्षे चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं. मनीषा ही नेपाळच्या राजकीय घराण्याशीही संबंधित आहे. त्यामुळे तिचा विवाह काठमांडूमध्येच अतिशय पारंपरिक पद्धतीनं पण शाही अंदाजात झाला होता.

सेलिना जेटली आणि आॅस्ट्रिया

मॉडेलिंगमधून चित्रपटाकडे वळलेल्या अनेक अभिनेत्रींपैकी एक सेलिना जेटली. अनेक काळ चित्रपटांपासून दूर राहिल्यावर आॅस्ट्रियामध्ये तिनं आपल्या एका मित्रासोबत विवाह केला. आॅस्ट्रिया हा युरोपियन देश प्रसिद्ध आहे, तिथल्या कलात्मक वारशासाठी. या कारणामुळेही सेलिनानं या देशाची निवड विवाहासाठी केली.