शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

विमानतळावर सामान हरवू शकतं. ते परत मिळवण्यासाठी या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 18:50 IST

विमानतळावर सामान हरवलं तर आता काय? असा हतबल करणारा प्रश्न पडतो. पण सामान हरवल्यानंतर काय करायचं हे जर पक्कं माहित असेल तर गहाळ झालेलं सामान विनाकटकट मिळतंही.

ठळक मुद्दे* सामानासंबधीची माहिती घेण्यासाठी एअरलाइन तुमच्याकडून प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्म अर्थात पीआयआर भरु न घेते. जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या सामानाची नुकसानभरपाई हवी असेल तर तुम्ही संबंधित विमान कंपनीला तसं लेखी कळवणं गरजेचं आहे.* एअरलाइन्स सामानासंबंधीची आपली जबाबदारी टाळत नाहीत. त्यामुळे नि:संकोचपणे एअरलाइन्सच्या सेंट्रल डिपार्टमेंटला किंवा एअरपोर्टवरच्या बॅगेज सर्व्हिसेसना सांगून तुम्ही सामानाच्या ट्रेसिंगला सुरूवात करु शकता.* तुमचा प्रवास परतीचा नसेल आणि तुमचं सामान हरवलंय, तुमच्याजवळ आता कपडे किंवा गरजेच्या इतर वस्तू नाहीयेत. अशा परिस्थितीत संबंधित विमानकंपनीनं तुम्हाला मूलभूत गोष्टी, कपडे यासाठीची नुकसानभरपाई देणं बंधनकारक आहे. 

- अमृता कदमतुम्ही विमानतळावर तुमच्या सामानाची वाट पाहात बेल्टपाशी उभे आहात. पण सामान काही येतच नाहीये. तुमचा धीर हळूहळू सुटतो आणि मग आपलं सामान गहाळ झालंय हे जाणवतं. अशावेळी  ‘आता काय करायचं ’ अशी  हतबल प्रतिक्रि या येणं स्वाभाविकच आहे. पण हातपाय गाळून काही होत नाही. विमानतळावर गहाळ झालेलं, हरवलेलं आपलं सामान परत कसं मिळवायचं हे माहित असणंही तितकंच गरजेचं आहे. 

 

विमानतळावर सामान हरवल्यास1. तत्परतेनं हालचाली करासामान हरवल्यानंतर नुसतंच भांबावून जाण्यापेक्षा सामान परत मिळवण्यासाठी तातडीनं हालचाली करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या एअरलाइननं प्रवास करत आहात, त्यांच्या डेस्कवर जाऊन तुम्ही तुमचं सामान गहाळ झाल्याची माहिती आधी द्या. एअरलाइन्स सामानासंबंधीची आपली जबाबदारी टाळत नाहीत. त्यामुळे नि:संकोचपणे एअरलाइन्सच्या सेंट्रल डिपार्टमेंटला किंवा एअरपोर्टवरच्या बॅगेज सर्व्हिसेसना सांगून तुम्ही सामानाच्या ट्रेसिंगला सुरूवात करु शकता. तुम्ही आॅनलाइन बॅगेज ट्रेसिंग पेजवर लॉग इन करूनही आपल्या सामानाची माहिती घेण्याचा प्रयत्न करु शकता. त्यासाठी तुमच्या लगेज रिसिटवरचा रेफरन्स नंबर तुम्हाला द्यावा लागतो.2. प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्मसामानासंबधीची माहिती घेण्यासाठी एअरलाइन तुमच्याकडून प्रॉपर्टी इररेग्युलॅरिटी रिपोर्ट फॉर्म अर्थात पीआयआर भरु न घेते. जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या सामानाची नुकसानभरपाई हवी असेल तर तुम्ही संबंधित विमान कंपनीला तसं लेखी कळवणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या पीआयआर फॉर्मची एक प्रतही तुम्हाला जोडावी लागते. अर्थात, ही प्रक्रि या तुम्ही प्रवास करत असलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे.3.सामानासंबंधीच्या बारीकसारीक गोष्टीही लक्षात ठेवातुम्हाला वैयक्तिक आणि फ्लाइटसंबंधीच्या माहितीबरोबरच तुमच्या सामानाचं अचूक वर्णन करता येणंही गरजेचं आहे. एअरलाइन स्टाफला तुम्ही तुमची बॅग आणि सामान यांचा बारीकसारीक तपशील पुरवू शकला तर तुमचं काम सोपं होऊन जातं. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासाला निघण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या बॅगेचे आणि सामानाचे एक दोन फोटो काढून ठेवलेले चांगलं. हा पुरावा जास्त ग्राह्यही मानला जातो.

 

4. आपलं सामान हरवलं आहे याची लेखी तक्रार तुमच्या प्रवासाच्या तारखेच्या सात दिवसांमध्येच करणं गरजेचं असतं.5. तुमचा प्रवास परतीचा नसेल आणि तुमचं सामान हरवलंय, तुमच्याजवळ आता कपडे किंवा गरजेच्या इतर वस्तू नाहीयेत. अशा परिस्थितीत संबंधित विमानकंपनीनं तुम्हाला मूलभूत गोष्टी, कपडे यासाठीची नुकसानभरपाई देणं बंधनकारक आहे. समजा तुम्ही प्रवास दोन वेगवेगळ्या विमानकंपन्यांसोबत करत असाल तर सामान परत मिळवण्यासाठी थोडाफार त्रास होऊ शकतो. अशावेळी तुमचं सामान तुम्ही ज्या कंपनीच्या विमानानं शेवटचा प्रवास केलाय त्यांच्याकडे क्लेम करणं केव्हाही चांगलं.तुम्ही तुमच्या सामानासंबंधीची माहिती आणि पावत्या दिल्यानंतर तुम्हाला तुमची नुकसानभरपाई रोखीनं दिली जाते.प्रवासात आपण आपल्या सामानाची काळजी घेतच असतो. पण तरीही कोणत्याही कारणानं सामान हरवलंच तर काय करायचंय हे माहित असलेलं चांगलं. खबरदारी घेतलेली कधीही फायद्याचीच ठरते.