शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग ही नऊ ठिकाणं आहेत की त्यातून एक निवडा!

By admin | Updated: May 12, 2017 18:50 IST

प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.

 

-अमृता कदम

बाइक म्हणजे प्रवासाचं एक साधन असं तुम्हा-आम्हाला वाटत असलं तरी अनेक जणांसाठी बाइक चालवणं ही पॅशन असते, त्यांचा छंद असतो. त्यामुळेच असे थ्रीलवेडे बाइकर्स गाडीला किक मारु न अगदी लांबच्या प्रवासाला जायला सज्ज असतात. प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.

1. खार्दुंग ला ते लेह-लडाख

खार्दुंग ला हा सगळ्यात उंचावरचा मोटरेबल रोड आहे. एका बाजूला हिमालयाच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यातून वळणं घेत जाणारा रस्ता...अ‍ॅडव्हेंचरसाठी तुम्हाला अजून काय हवंय? मनालीमधून बुलेटसारखी दमदार बाइक भाड्यानं घेऊन तुम्ही हा प्रवास करु शकता. या प्रवासात पहाडी, बौद्ध संस्कृतीच्या खुणाही जागोजागी दिसतात. एप्रिल पासून आॅगस्टपर्यंत तुम्ही केव्हाही या प्रवासाला जाऊ शकता. पण त्यानंतर बर्फवृष्टी सुरु व्हायला लागली की हा रस्ता बऱ्याचदा बंद असतो.

2. स्पिती व्हॅली

जर तुम्ही लेह-लडाख, हिमाचल प्रदेशला फिरायला निघालाच असाल, तर बाइकवरु न स्पिती व्हॅलीला जायला अजिबात विसरु नका. सतलज नदीला सोबत घेऊन प्रवास करताना काजा, टैबो, स्पिती आणि पीन व्हॅलीसारखी ठिकाणं तुम्हाला थांबायला भागच पाडतात. इथल्या बस्पा आणि किन्नौर भागात रस्त्याच्या कडेनं सफरचंद आणि जर्दाळूच्या बागा दिसतात. वाटेत एखाद्या मंदिरात थांबल्यावर येणारा शांततेचा अनुभव एरवीच्या धकाधकीत विरळाच. इथे जाण्यासाठीही लेह-लडाख प्रमाणेच एप्रिल ते आॅक्टोबरपर्यंतचा काळ योग्य आहे.

 

          

3. वालपराई आणि वाझाचल फॉरेस्ट

बाइक रायडिंगसाठी हा ड्रीम रूट मानला जातो. केरळ आणि तामिळनाडूमधून जाणारा हा रस्ता तामिळनाडूतल्या पोलाची आणि केरळमधल्या चालाकुडीला जोडतो. सदाहरित जंगलामधून जाणाऱ्या या रस्त्यावरु न बाइक चालवण्याचा आनंदच अवर्णनीय! शिवाय हा प्रदेश भरपूर पावसाचा असल्यानं वाटेत अनेक छोटे-मोठे धबधबे तुम्हाला पहायला मिळतात. अथिरपाल आणि वाझाचलचे धबधबे हे या मार्गावरील खास आकर्षण. हा प्रवास करण्याचा काही खास सीझन नाही. तुम्ही वर्षातून केव्हाही या मार्गावरु न प्रवास करु शकता.

4. मुंबई ते गोवा

दिल चाहता है गाण्यातला मुंबई ते गोवा प्रवास सगळ्यांनाच आठवत असेल. अनेकांनी तसाच गाडीनं केलेल्या प्रवासातला रोमँटिसिझम अनुभवला असेलच; पण मुंबईवरु न गोव्याला बाइकवरु न निघण्यातही एक रोमांच आहे. बाइकिंगचे शौकिन आणि सराइत प्रवाशांच्या दृष्टीनं हा मार्ग बराचसा अमेरिकेतल्या 101 हायवेशी मिळता-जुळता आहे. जवळपास दहा तासांचा हा प्रवासच तुम्हाला रिफ्रेश करून टाकतो.

5. जयपूर ते जैसलमेर

प्रवास म्हटलं की रस्त्याच्या दुतर्फा शेतं, झाडं आणि त्यातून धावणारी आपली गाडी हेच चित्र डोळ्यासमोर उभं राहत. पण तुरळक, काटेरी बोरी-बाभळीची झाडं आणि उडणारी पिवळसर रेती...जयपूरपासून जैसलमेरला जाण्याचा हा अनुभव आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. 600 किलोमीटरच्या या साहसी प्रवासात राजस्थानमधले प्रदेशांचं वेगळेपण तसंच राजस्थानची संस्कृती समजून घ्यायला मदत होते. अर्थात राजस्थानमधल्या भयंकर उष्णतेचा विचार करता हा प्रवास करायला आॅक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी एकदम योग्य!

           

6. अहमदाबाद ते कच्छ

जयपूर ते जैसलमेरप्रमाणे हा प्रवासही वाळवंटातूनच होतो. फरक एवढाच की इथे भवताली तुम्हाला पीठ पसरल्याप्रमाणे शुभ्र रेती पहायला मिळते. रात्री हा प्रवास करण्याचा अनुभव शब्दांत न मांडता येण्याजोगाच आहे. अंधाऱ्या रात्रीत चमकणारे शुभ्र रेतीचे कण तुम्हाला चांदण्यातून सैर केल्याचा अनुभव देतात. उष्म्यामुळे या प्रवासालाही तुम्ही डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यानच जाऊ शकता.

7. वेस्टर्न अरु णाचल प्रदेश

हिमालयाच्या रांगांतून प्रवास करण्याचा आनंदच वेगळा असतो. त्यामुळे वेस्टर्न अरूणाचलची सफर तुमच्यासाठी नक्कीच यादगार बनेल. हा पहाडी भाग असल्यानं इथले रस्ते फारसे चांगले नाहीत. त्यामुळे या चढ-उतारांनी भरलेल्या रस्त्यावरु न बाइक चालवण्यात एक वेगळंच थ्रील असतं. मधूनच बर्फाची जणू पातळ चादरच अंथरली आहे, असे रस्त्याचे पट्टे...इथल्या आदिवासी संस्कृतीशीही तुमची ओळख होते. मार्च ते मे आणि आॅक्टोबर ते नोव्हेंबर हा प्रवासासाठीचा सगळ्यात उत्तम काळ.

8. शिलाँग ते चेरापुंजी

पाण्याची दोन वेगवेगळी रूपं या प्रवासात पहायला मिळतात. शिलाँगमध्ये बर्फाच्छादित शिखरं तर चेरापुंजीच्या दिशेनं यायला लागल्यावर पावसाच्या हलक्या सरी...त्यामुळे हा प्रवास करताना बाइक काळजीपूर्वकच चालवावी लागते. हा प्रवासही सीझनचा विचार करु नच प्लॅन करावा लागतो. कारण इथे येण्यासाठीचा योग्य काळ म्हणजे आॅक्टोबर ते मार्च.

9. दार्जिलिंग ते सिक्कीम

हिमालयातून जाणारा हासुद्धा पहाडी रस्ता. या प्रवासात तुमच्या बाइकच्या सोबत ‘मेरे सपनों की राणी’ गाण्यात दिसलेली आणि युनेस्कोच्या वलर््ड हेरिटेजमध्ये सामील केलेली ट्रेनही असेल. शिवाय जगातील दुसऱ्या क्र मांकाचे उंच शिखर असलेल्या कांचनजुंगाचंही या प्रवासात दर्शन होत राहतं. वर्षभरात केव्हाही तुम्ही ही ट्रीप प्लॅन करु शकता. या ट्रीपला जाण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बायकर्स क्लबशी संपर्क साधू शकता. किंवा तुमचा ग्रूप असेल तर स्वत:ही प्रवास प्लॅन करु शकता. बाइकच्या प्रवासात मुक्कामाचं ठिकाण महत्त्वाचं नसतं तर महत्त्वाचा असतो आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होत घेतलेला प्रवासाचा अनुभव. अशा अनुभवाला सामोरं जायचं असेल, तर या सुट्टीत तुमच्या बाइकला तुम्ही नक्की किक मारु शकता.