Navratri Mahotsav 2025: उत्सव शक्तीचा, सृजनाचा आणि आनंदी जगण्याचा. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.