महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.