शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. निवडणुकीबाबत आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:03 IST

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे.

आसनगाव : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणरचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहापूर तालुक्यातील गट आणि गणरचना ही पूर्णपणे सदोष पद्धतीने केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता केवळ लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून ही गट आणि गणरचना केल्याची तक्रार आगरी क्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.गट आणि गणरचना करताना भौगोलिकदृष्ट्या सलगता असली पाहिजे, या तत्त्वाची कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नसून दळणवळणाच्या सोयीसुविधा लक्षात घेतलेल्या नाहीत. अनेक ग्रुपग्रामपंचायती या वेगवेगळ्या गणांत विभागल्या गेल्या आहेत. तसेच वासिंद, कसारा यासारख्या ग्रामपंचायतीचे भविष्यात नगरपंचायतीत रूपांतर होणार आहे. या ठिकाणच्या गट तसेच गणांची रचना करताना इतर गावांचा समावेश करणे चुकीचे आहे. नव्याने करण्यात आलेल्या गट आणि गणरचनेमध्ये शहापूर नगरपंचायत वगळून गट आणि गण कायम ठेवणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता, भौगोलिक सलगता हा निकष न लावता, केवळ शहापूर तालुक्याचा नकाशा समोर ठेवून ही रचना केल्याचा आरोप त्यांनी निवेदनामध्ये केला आहे.शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गणरचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असून भौगोलिक सलगता आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीसुविधा लक्षात न घेता ही रचना केली असून याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे हरकत घेतली असून विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे सुनावणी होणार आहे तसेच याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील तक्र ार केली आहे. यामध्ये समाधानकारक निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे.- शिवाजी अधिकारी (अध्यक्ष, आगरी क्र ांती सामाजिक संघटना)