शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेद्वारे 13 खासगी रुग्णालयांत 239 खाटांची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:20 IST

बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक

सुरेश लाेखंडे

ठाणे :  मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा नागरी, सागरी आणि डोंगरी दुर्गम भागात विस्तारला आहे. अतिशय झपाट्याने होत असलेल्या नागरिकरणामुळे देशात सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख आहे. येथील दुर्गम भागातील गावखेडे आणि पाड्यांमधील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग घेत आहे. लहान मोठे शहर आणि गावांमध्ये आरोग्य विभागाने आतापर्यंत १४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली आहे. त्यात प्रसूती वार्डसह अन्य रुग्णांच्या २३९ खाटांना परवानगी दिलेली आढळून आली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवामुळे रुग्णालयांची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जिल्हा परिषदेची स्वत:ची ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेने १४ खासगी रुग्णालयांची नोंदणी बॉम्बे नर्सिंग ॲक्ट (२००५) नुसार करून, त्यांना वैद्यकीयसेवेची परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाेंदणी नसलेल्या रुग्णायांचे काय हा प्रश्न चर्चेचा झाला आहे.

फायर ऑडिटची शहानिशा गरजेची या रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीच्या उपाययोजना, फायर ऑडिट आदींची शहानिशा करण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. जेणेकरून रुग्णालयांमध्ये काेणतीही अनुचित घटना हाेणार नाही.

नोंदणी न केल्यास होणारी कारवाई  गावांमध्ये रुग्णालय, दवाखाना सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांच्यावर बाॅम्बे नर्सिंग कायद्याखाली कायदेशीर कारवाई जि.प. आरोग्य विभागाद्वारे केली जाते. या कारवाईमुळे रुग्णालय, दवाखाना बंद करावा लागताे.

देखभाल-दुरुस्ती, फायर ऑडिटबाबत यंत्रणा सतर्कजिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत रुग्णालये, दवाखाने आदींची नोंदणी आरोग्य विभागाकडे आधीच केलेली आहे. त्यांच्या देखभाल, दुरुस्ती, सेवा, सुविधा आणि फायर ऑडिट आदींची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. भंडारा येथील दुर्घटनेनंतर सुरक्षा यंत्रणेवर लक्ष केंद्रित करणार आहे.     - सुभाष पवार, उपाध्यक्ष, जि.प., ठाणे

विषय गांभीर्याने घेणे आवश्यकजिल्ह्यातील या गाव, खेड्यांमधील २४० खाटांची १४ रुग्णालये व आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेचा विषय गाभीर्याने घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :thaneठाणे