शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित; निवडणूक खर्चासह दीड कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 00:44 IST

निवडणूक खर्च व मानधन असे दीड कोटींच्या आसपास रक्कम थकीत आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन दोन वर्षांचा काळ उलटला, तरी या निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही पारश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता अद्यापही मिळाला नसल्याने कर्मचाºयांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तो मिळावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने देण्यात आली. निवडणूक खर्च व मानधन असे दीड कोटींच्या आसपास रक्कम थकीत आहे.निवडणुका म्हटल्या की, उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणा कामास लागते. दोन्ही घटकांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असते. निवडणुकीच्या माध्यमातून शासकीय अधिकारी व कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामास सुरु वात होत असते. मतदानाच्या आधी, मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणी काळात निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविली जाते. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त सुरक्षा कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, फिरते पथक, आयकर निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक यांच्यावर धुरा सोपविली जाते. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण, मतदानाच्या आधी साहित्यवाटप, मतदान दिवस, त्या दिवशी भोजनभत्ता अशा टप्प्यांत पैसे दिले जातात. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडून अधिकारी, कर्मचाºयांना पारिश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता अद्यापही मिळाला नसल्याची बाब समोर आली.दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना पारिश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता असे एक कोटी १७ लाख ८१ हजार ८७ रुपये अद्याप शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. तर, निवडणुकीच्या वेळी लागणाºया साहित्य व वाहनांवरील खर्च, प्रशिक्षणावरील खर्च एकूण ३० लाख ११ हजार ४२८ अशी एकूण एक कोटी ४७ लाख ९२ हजार ५०६ एवढे देणी शिल्लक आहे.

टॅग्स :thaneठाणे