शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे युवक जखमी

By अनिकेत घमंडी | Updated: June 17, 2024 20:12 IST

एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

डोंबिवली: महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका ​डोंबिवलीतील युवा तरणपटुना बसला. येथील संत सावळाराम महाराज क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तन्मय कांबळे या (१३)वर्षीय युवकाच्या हाताला तरण तलावातील तुटलेल्या टाईल्समुळे दुखापत झाल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी घडला.

मात्र त्या ठिकाणी प्रथमेाचार बॉक्समधील औषधे चालू स्थितीत नसल्याचे डयुटीवर असलेल्या पालिकेच्या कर्मचा-यांच्या निदर्शनास आणूनही त्यांनी दखल घेतली नाही. प्रथमोपचार न मिळाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारीत धारेवर धरले. डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात राहणारे तन्मय कांबळे आणि शार्दूल हंकारे हे दोघे युवक ​रविवारी सांयकाळच्या बॅचमध्ये डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलावात पोहण्यासाठी गेले होते.

तरण तलावात पोहोत असतानाच तरण तलावातील तुटलेल्या टाईल्सचा एक भाग तन्मयच्या डाव्या हाताला लागू तो चिरला गेला. हाताला गंभीर दुखापत झाल्याचे लक्षात येताच  दोघांनीही तरण तलावातून बाहेर येत तेथील डयुटीवर असलेले कर्मचारी आणि इतर कर्मचा-यांच्या निदर्शनास आणल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचा-यांनी तत्परतेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप तन्मयने केला. तेथील फर्स्ट एड बॉक्समध्ये पुरेसे औषधे नसल्याचा आरोप युवकांनी केला. त्यामुळे त्या ठिकाणी प्राथमिक कोणतेही उपचार न झाल्याने ते  दोघेही रिक्षाने आपल्या गोग्रासवाडी येथील घरी आले, रविवार असल्याने डॉक्टर उपलब्ध नव्हते.

सदर प्रकार तन्मयने पालकांना सांगितल्यानंतर, त्याच्या पालकांनी तरण तलाव येथे धाव घेऊन पालिकेच्या कर्मचा-यांना जाब विचारला. पालिकेच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला. जखमी झालेल्या तन्मयावर महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार करण्यात आले.  पालिकेच्या तरण तलावात वारंवार तरूणांना अशा दुखापतींना तरूणांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे एकप्रकारे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार केाण ? असा संतप्त सवाल पालकांनी केला.  तलावाची डागडुज्जी करण्याची पालिकेची जबाबदारी आहे. तरूणांना दुखापत झाली तर त्यावर उपचार करण्याची तेथील कर्मचा-यांची जबाबदारी आहे. मात्र पालिकेच्या कर्मचा-यांचे कोणतेही लक्ष नसते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवली