शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

टोइंंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याची तरुणाला धक्काबुक्की; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:43 IST

टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते

ठाणे : ठाणे शहर पोलिसांच्या कंत्राटी टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने नो-पार्किंगमधील महेंद्र माने या दुचाकीचालकाशी हुज्जत घालून त्याला धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उथळसर भागात घडली. याप्रकरणी राबोडी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यातील रहिवासी माने हे अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या एका कंपनीत नोकरीला आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांनी उथळसर येथील एका उपाहारगृहासमोर त्यांची दुचाकी उभी केली. त्यानंतर, ते उपाहारगृहात अन्नपदार्थ घेण्यासाठी गेले. त्याचदरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेची टोइंंग व्हॅन त्याठिकाणी आली. नो-पार्किंगमध्ये असलेली माने यांची दुचाकी टोइंंग व्हॅनवरील कर्मचारी उचलून व्हॅनवर ठेवत असतानाच तिथे ते पोहोचले. त्यांनी या कारवाईला विरोध करीत त्यांची दुचाकी खाली खेचण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, टोइंंग व्हॅनवरील एका कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते. मात्र, या वाहतूक पोलिसांकडून अशी कोणतीही उद्घोषणा झाली नसल्याचा आरोपही माने यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांचीही एकमेकांविरुद्ध तक्रार असल्यामुळे माने यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. याबाबतची चौकशी करण्याचे आदेश राबोडी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

दुचाकी उचलताना उद्घोषणाही पोलीस कर्मचाऱ्याने केली नव्हती. दुचाकी टोइंंगच्या व्हॅनवर ठेवली जात असतानाच कारवाईला विरोध केला. मात्र, व्हॅनवरील कर्मचाऱ्याने न जुमानता गाडी खेचण्याचा प्रयत्न केल्याने झटापटीत हाताला मार लागला. - महेंद्र माने, जखमी तरुण