शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खड्ड्यांतूनच करा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:55 IST

एमएमआरडीएची इच्छा : लोकनगरी रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वाहनचालक झाले त्रस्त

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील पाच रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी या रस्त्याचे हस्तांतरण एमएमआरडीएकडे करण्यात आले आहे. मात्र, काम सुरू करणे तर दूरच, ते रस्ते वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठीही एमएमआरडीए पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने हा रस्ता हस्तांतरित केल्याचे कारण पुढे करून रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. एमएमआरडीए रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गंभीर नसल्याने वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी या रस्त्याची दुरुस्ती रखडलेली आहे.

सरकारच्या दोन विभागांतील समन्वयाचा अभाव असल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, याची प्रचीती लोकनगरी रस्त्यावर अनुभवता येत आहे. वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी ग्राउंडपर्यंतचा रस्ता हा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून आनंदनगर औद्योगिक वसाहतीत शेकडो कामगार वाहने घेऊन जात असतात. त्यामुळे नागरिकांसह कामगारांनाही खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनगरी रस्त्यामुळे संपूर्ण पूर्व भाग जोडला गेला आहे. त्यामुळे हा रस्ता सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण हे एप्रिल महिन्यातच मंजूर झाले आहे. मात्र, अजूनही एमएमआरडीएने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदाराकडून आहे तो रस्ता किमान दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र, चार महिन्यांत एकदाही एमएमआरडीएने या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पालिकेचा असला, तरी कामासाठी एमएमआरडीएकडे असल्याने पालिकाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. नागरिकांनाही याच खराब रस्त्यातून मार्ग काढत जावे लागत आहे.

अंबरनाथ नगरपालिकेने तीन वर्षे देखभाल दुरुस्तीच्या नावाने हा रस्ता कंत्राटदाराला काम करण्यासाठी दिला होता. मात्र, या रस्त्याला पाच वर्षे झाली असून त्याच कंत्राटदाराकडून काम करून घेण्यात येत आहे. तीन वर्षे देखभाल दुरुस्ती केल्यावर कंत्राटदाराची जबाबदारी संपलेली असतानाही पालिका प्रशासन नव्या प्रस्तावाला मंजुरी देत नव्हते. त्यातच, एमएमआरडीएकडे हा रस्ता गेल्यावर पालिकेने संपूर्ण अंग काढून घेतल्याने गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होईल, याची शक्यता नाही.नेमकी तक्रार कुणाकडे करावीएमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कंत्राटदारामार्फत या रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता किमान वाहतुकीसाठी योग्य करणे गरजेचे होते. मात्र, ते कामही केले जात नसल्याने नेमकी तक्रार करावी कुणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.संबंधित यंत्रणांनी त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाthaneठाणेbhiwandiभिवंडी