शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

येस बँकेत ग्राहकांची उडाली झुंबड, कर्मचाऱ्यांशी उडाले खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 01:01 IST

पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या रोषालाही बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

ठाणे : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्यामुळे जिल्हाभरातील बँकेच्या शाखांबाहेर शेकडो ग्राहकांची शुक्रवारी एकच झुंबड उडाली. खात्यातून केवळ ५० हजार रुपयेच काढता येत असल्यामुळे जी मिळेल ती रक्कम काढण्यासाठी सकाळीच खाते असलेल्या शाखेमध्ये ग्राहकांनी धाव घेतली. पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या रोषालाही बँक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र, प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर अशा सर्वच ठिकाणी बँक शाखांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ८ वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे राहिले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी काही ठिकाणी पैसे देण्यासाठी काउंटरच सुरू झाले नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. तास-दोन तासांनंतर रांगेत काढल्यानंतर काउंटर सुरू झाले. एटीएम, नेटबँकिंग बंद झाल्याने ग्राहकांमध्ये घबराट पसरली होती. बँक कर्मचारी ग्राहकांना ‘पैसे काढण्याची घाई करू नका. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. त्यांची मुदतठेव करा’ असे सल्ला देत होते. मात्र, कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावरून त्यांची बँक कर्मचाºयांशी शाब्दिक चकमकही उडाली. एकीकडे ग्राहकांची गर्दी ववाढत असताना काही शाखांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परिस्थिती आणखी चिघळली. सकाळपासून रांगेत उभे राहूनही काही जणांना पैसे न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. त्यांना टोकन देऊ न घरी पाठवण्यात आले. पैशांची जशी उपलब्धता असेल, तसे ग्राहकांना ते देण्यात येतील, असे बँक कर्मचारी सांगत होते.संबंधित वृत्त/आतील पानांत>इतर बँकांनी साधली संधीआर्थिक अडचणीत सापडलेल्या येस बँकेचे ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी इतर बँकांनी ही नामी संधी साधली. काही बँकांनी तिथेच आपले काउंटर थाटले होते. या काउंटरवरील कर्मचारी पैसे काढून बाहेर येणाºया ग्राहकांना आपल्या बँकेत खाते खोलण्याची विनंती करताना दिसत होते. व्यावसायिक चढाओढ पाहून हे ग्राहकही आश्चर्य व्यक्त करत होते.