शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:59 IST

ठाणे महापालिकेने केला दावा; घरोघरी जाऊन पाण्याच्या नमुन्यांची केली तपासणी

ठाणे : पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. ठाण्यातील आरोग्यसेवेची दरवर्षी महासभेत चिरफाड होत असते. मागील नऊ वर्षांत आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असला, तरी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे आढळून आले आहे. महापालिका हद्दीत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या यंदा ११४ होती. हीच संख्या २०१५ मध्ये ४७० एवढी आढळून आली होती, तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या यंदा ३८२ एवढी आढळून आली आहे.ठाणेकरांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या साथरोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असतो. फायलेरिया विभागाचे २१० अधिकारी, कर्मचारीवर्ग आणि प्रत्येक आरोग्य केंद्रातील १५० कर्मचाऱ्यांचा स्टाफ पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवून असतात. एखाद्या ठिकाणी साथरोगांचा फैलाव वाढू लागला, तर त्या भागात जाऊन आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे प्रत्येकाचे रक्तनमुने तपासणार असून, त्याच ठिकाणी उपचार करणार आहेत. याशिवाय, दीड लाख भित्तीपत्रके तयार करण्यात येऊन ती वाटप करण्यात आली होती. विकासकांच्या कामांच्या ठिकाणीदेखील खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच ज्या विकासकांची नव्याने कामे सुरू आहेत, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.याशिवाय, घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणे, जनजागृती करणे, आदी कामे या माध्यमातून केली गेली. तसेच मच्छरांची पैदास वाढू नये म्हणून खाजगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी पाइपला नायलॉन जाळ्या बसविण्याचे काम केले होते. याशिवाय, इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. त्यामुळेच यंदा साथरोगांची जास्त समस्या ठाण्यात आढळून आली नसल्याचा महापालिकेचा दावा आहे. शहरात यंदाच्या वर्षात डेंग्यूचे ११४ रुग्ण आढळले आहेत. तर, मलेरियाचे ३८२ रुग्ण आढळले आहेत. हत्तीरोगाचे ११ रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :dengueडेंग्यू