शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

गेलं ते वर्ष आणि गेला तो काल, नवीन संकल्पना, अपेक्षा घेऊन आले २०२१ साल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:53 IST

हे पूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीमध्ये गेले. मानवजातीच्या पुढील अस्तित्वाची शंका यावी असे संपूर्ण जगात वातावरण होते.

हे पूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीमध्ये गेले. मानवजातीच्या पुढील अस्तित्वाची शंका यावी असे संपूर्ण जगात वातावरण होते. पण आता ही नकारात्मकता दूर सारत येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे. डिसेंबरला सुरुवात झाली की वेध लागतात ते नवीन वर्षात पाऊल टाकण्याचे. नवीन वर्षाची चाहूल लागली की, सगळ्यांनाच एक नवा उत्साह येतो आणि सगळे संकल्प तयार करण्यासाठी सज्ज होतात. मराठी चित्रपट, नाट्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे नेमके काय संकल्प आहेत, त्यांचा घेतलेला हा धांडोळा !

फिटनेसकडे लक्ष देणार!वाचन, लेखन वाढवायचं आहे. कोरोनामुळे कामाची विस्कटलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणायची आहे. माझे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये आणखीन नवीन सुधारणा करायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिटनेसकडे लक्ष द्यायचे आहे.      - स्पृहा जोशी, अभिनेत्री

विनोदी नाटक लिहायचंय!मागील वर्षी कोरोनाकाळात योगा आणि प्राणायामाला सुरुवात केली, ती आता सवयीचा भाग बनली आहे. यामध्ये नवीन वर्षात खंड पडू द्यायचा नाही, हा संकल्प असणार आहे. दुसरं म्हणजे या वर्षी काही झाले, तरी एक विनोदी नाटक लिहायचं आहे. ॲक्टिंगकडे लक्ष केंद्रित करायचे आहे.                  - अभिराम भडकमकर, पटकथा लेखक, अभिनेता

रसिकांना सर्वोत्तम कलाकृती देणं हाच संकल्प'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दोन शेड्युल्ड पूर्ण झाले असून, शेवटच शेड्युल्ड जानेवारीमध्ये भोर येथे सुरू होईल. हा सिनेमा नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस आणणे हा माझा संकल्प आहे. याशिवाय आणखी काही २-३ प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे.                                 - प्रसाद ओक, अभिनेता, दिग्दर्शक

वाड्यावस्त्यांवर कविसंमेलने घेणार मी गेल्या दोन महिन्यात काही कार्यक्रम केले. यातील बरेच कार्यक्रम कोकण, मुंबईत होते. कोकणातील वाड्यावस्त्यांमध्ये साहित्याची गंगाजळी अजून म्हणावी तशी पोहोचली नाही. या ठिकाणी मराठी साहित्य, सांस्कृतिक परंपरेचा इतिहास पोहोचवायला हवा. परतीच्या प्रवासात मनाशी पक्के केले की वाड्यावस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने कार्यक्रम घ्यायचे.     - अशोक नायगांवकर,   सुप्रसिद्ध कवी

नवीन चित्रपट तयारलेखक, दिग्दर्शक म्हणून 'वेडिंग्जचा सिनेमा' हा चित्रपट लॉकडाऊनच्या काळात मोठ्या संख्येने पाहिला गेला. 'एकदा काय झालं' हा चित्रपट तयार आहे. नवीन वर्षात योग्य वेळी तो प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा माझा संकल्प आहे.          - सलील कुलकर्णी, गायक, दिग्दर्शक

वेबसीरिजवर काम सुरूआता फक्त काम करायचे आहे. ‘दगडी चाळ-२’ या मराठी चित्रपटावर आणि ‘समांतर-२’, ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजवर काम सुरू आहे. या तीनही गोष्टी नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतील. २०२० हे वर्ष नैराश्यतेच्या गर्तेत गेले. हे वर्ष लवकर संपावे, असे सर्वांनाच वाटत आहे.          - अमित राज, संगीत दिग्दर्शक

आरोग्यदायी जीवन महत्त्वाचेखरे सांगायचे तर मी कुठलाच संकल्प करत नाही. कोरोनाने आपल्याला स्वच्छतेचे, सामाजिक जबाबदारीचे भान कसे ठेवायचे ते शिकविले. तेव्हा आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करणे महत्त्वाचे आहे.           - बेला शेंडे, गायिका

 

टॅग्स :New Yearनववर्षthaneठाणे