शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांवर यंदा ‘कडकीचे विघ्न’

By admin | Updated: September 3, 2015 23:22 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवावरही विरजण पडणार आहे. मंडपाच्या कमी होणाऱ्या आकारामुळे देखाव्यांच्याही आकारावर निर्बंध येणार आहेत.

ठाणे : उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता दहीहंडीपाठोपाठ गणेशोत्सवावरही विरजण पडणार आहे. मंडपाच्या कमी होणाऱ्या आकारामुळे देखाव्यांच्याही आकारावर निर्बंध येणार आहेत. तसेच विद्युत रोषणाई आणि इतर सर्वच बाबींवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करायचा, असा पेच गणेशोत्सव मंडळांपुढे निर्माण झाला असतांनाच आता त्यांना कोणी वर्गणीही देत नसल्याने त्यांच्यावर कडकीचे विघ्न ओढावले आहे. उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर ठाणे महापालिकेनेही या मंडपासंदर्भातील पॉलिसी महासभेपुढे सादर करून ती मंजूर करून घेतली आहे. त्यानुसार, आता मंडपांना परवानगी दिली जात आहे. परंतु, यामुळेच या उत्सवावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण, काही मंडळांना १० बाय १०० फुटांचीच परवानगी मिळाल्याने मंडप उभारायचा कसा, मूर्ती किती उंच आणायची आणि देखावा काय करायचा, असा पेच निर्माण झाला आहे. त्यात उत्सवाच्या नावाखाली गोळा केल्या जाणाऱ्या वर्गणीला खंडणी म्हटले गेल्याने आता मंडळांपुढील तो पेच आणखी वाढला आहे. घरोघरी आणि दुकानदारांकडे वर्गणी मागण्यासाठी जात असलेल्या गणेशोत्सव मंडळांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे वर्गणी मिळाली नाही तर उत्सव कसा होणार? महाभंडारा कसा घालायचा असे विविध प्रश्न आता मंडळांना सतावू लागले आहेत. ठाण्यात २०० हून अधिक मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवावरील संकटाचे ढग गडद होऊ लागल्याने आता काही पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून हा उत्सव साजरा करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.