शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विवेक पंडितांच्या सुटकेसाठी श्रमजीवीचा ठिय्या

By admin | Updated: May 2, 2017 02:53 IST

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्त्यांवर असभ्य

 श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्त्यांवर असभ्य वर्तनाच्या आरोपाखाली पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निधी चौधरी यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे येथील मध्यवर्ती कारागृहात असलेले पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडण्यात यावे आणि सीईओंवर कारवाई करावी, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे ६०० कुपोषित बालकांचा मागील वर्षी मृत्यू झाला आहे. तर ८०० बालके कुपोषणाने पिडीत असून मृत्युच्या उंबरठ्यावर आहे. या बालकांचे मृत्यू टाळणाऱ्या अंगणवाडी केंद्रांच्या समस्या, सेविका, मदतनीस, कुपोषण निर्मुलन आदी मागण्यांसाठी पालघर जिल्हा ंपरिषदेवर ‘सरकारचे डोहाळे जेवण’ या नावे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास लेखी आश्वासन देणाऱ्या सीईओंनी दुसऱ्या दिवशी असभ्यतेच्या आरोपाखाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आणि ठाण्यासह पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आदोलन सुरू केले आहे. या खोट्या गुन्ह्याखाली पंडित यांच्यासह ११ महिला आणि ३६ कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यामुळे हा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या सीईओंवर कडक कारवाई करावी, पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांना बिनशर्त सोडवण्यात यावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहो. दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामुळे त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट होऊ शकती नाही. यानंतर शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी यांची भेट घेतली. षडयंत्र रचून कार्यकर्त्यांवर लोकशाहीत असे खोटे गुन्हे सरकारी अधिकारी दाखल करीत असतील तर आदिवासी, गोरगरीब जनतेची गाऱ्हाणी आम्ही कोणाकडे मांडावी, अशी कैफियत त्यांनी मांडली. संबंधित सीईओंवर कारवाईची मागणी या शिष्टमंडळाने केली.