शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरीसाठी त्रिकुटातील एकाच्या गोळीबारात कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:07 IST

भिवंडी : शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अत्याचार,चोरी व हाणामारीचे प्रकार जास्त संख्येने घडू लागले आहेत. शहरालगत सोनाळे ...

ठळक मुद्देचोरांच्या त्रिकुटापैकी एकाने केला गोळीबारकामाक्षाप्रसाद साहू कामगार गोळीबारात जखमीगोळीबारानंतर मोबाईल घेऊन त्रिकुटाचे पलायन

भिवंडी : शहर आणि ग्रामिण भागात मोठ्या संख्येने अत्याचार,चोरी व हाणामारीचे प्रकार जास्त संख्येने घडू लागले आहेत. शहरालगत सोनाळे गावातून घरी परतणाऱ्या कामगारास सोमवार रोजी रात्री एकटे गाठून लुटणाºया त्रिकुटाने त्याच्यावर गोळीबार करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले.कामाक्षाप्रसाद नारायण साहू(३०) असे सोनाळे गावातील कंपनीत काम करणा-या कामगाराचे नांव असून तो सोमवार रोजी रात्री साडेआठ वाजता कामावरून घरी जात होता. तो एकटा असल्याचे पाहून समोरून दुचाकीवर बसून येणा-या तीन चोरट्यांनी त्यास अडविले. त्याच्याकडून मोबाईल हिसकावू लागल्यानंतर कामाक्षाप्रसाद याने त्यांना प्रतिकार केला असता त्यांच्यात झटापटी झाली. दरम्यान चोरांच्या त्रिकुटापैकी एकाने आपल्या रिव्हाल्वर मधून कामाक्षाप्रसादाच्या दिशेने गोळीबार केला. त्यापेकी एक गोळी कामाक्षाप्रसादच्या पायास लागली. तो जखमी झाल्यानंतर त्याच्या हातातील मोबाईल घेऊन तिघे दुचाकीवरून पळून गेले. जखमी कामाक्षाप्रसाद यांस शहरातील खाजगी रूग्णालयांत उपचारासाठी दाखल केले असून या घटनेप्रकरणी तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनाळे या गावात औद्योगीक वसाहत असून येथे परप्रांतातून अलेले कामगार काम करीत आहेत. या कामगारांना रात्रीच्या वेळी एकटे गाठून मारहाण करणे,लूटणे असे प्रकार घडत असतात.त्यामुळे परिसरांतील नागरिकांनी भिती व्यक्त करून पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीFiringगोळीबार