शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: November 8, 2016 02:15 IST

महापालिकेच्या सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या असहकार आंदोलनाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने

भिवंडी : महापालिकेच्या सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या असहकार आंदोलनाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने कामगारांनी सोमवारपासून मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन कामगारांना दिले.पालिका अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीप्रमाणे कामगारांच्या पगाराची तजवीज करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पार न पाडल्याने कामगारांची दिवाळी अंधारात गेली. मागील महिन्याचे वेतन व दिवाळीचे सानुग्रह अनुदान न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. कायदे धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांचे काम सुरू असल्याने भ्रष्ट कारभार वाढला आहे. जो अधिकारी अधिक भ्रष्टाचार करतो त्याला मोठे पद दिले जाते. त्यामुळे महापालिका आर्थिक दिवाळखोरीत जाऊन आज कामगारांना पगार देता येत नाही अशी पालिकेची स्थिती झाली आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे. तर कामगारांच्या विमापॉलिसी व पीएफच्या रकमेत घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आयुक्त कारवाई करीत नाही असाही आरोप करण्यात आला.पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे व महापौर तुषार चौधरी यांच्यात संवाद व समन्वय नसल्याने कामगारांवर ही वेळ आली असून या सर्व मागण्यांसाठी मुख्यालयासमोर भिवंडी महापालिका कामगार-कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे हजारो कामगारांनी ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.उपोषणाच्या ठिकाणी शहरातील एकही आमदार न आल्याने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सरकारचे अनुदान मिळाल्यानंतर कामगारांचे पगार देण्याचे आश्वासन दिले. कामगारांचे पगार लवकर व्हावे यासाठी भिवंडी पालिकेस अनुदान मिळावे या मागणीसाठी आझमी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत,असे त्यांनी उपोषण कर्त्यांना सांगितले.(प्रतिनीधी)