शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिका-यांसह सभापतींचा नव्याको-या गाड्यांसाठी हट्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:38 IST

अस्तित्वात आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापती व पाच पंचायत समित्यांच्या सभापतींकडून नव्या गाड्यांसाठी हट्ट धरण्यात आला आहे.

सुरेश लोखंडेठाणे : अस्तित्वात आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सभापती व पाच पंचायत समित्यांच्या सभापतींकडून नव्या गाड्यांसाठी हट्ट धरण्यात आला आहे. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या सुमारे ११ नव्या गाड्यांच्या हट्टाची पूर्तता करण्यासाठी २१ फेब्रुवारीला होणा-या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेतला जाणार आहे.जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या सर्वांगीण विकासाकरिता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांसह कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांचे सभापती नुकतेच कार्यरत झाले. त्यांच्याकडून अद्याप विकासाची एक वीट लावण्यात आली नाही. मात्र, आल्याआल्या नव्या गाड्या खरेदी करण्याचा हट्ट पदाधिकाºयांकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.गावपाड्यांचा सर्वांगीण विकास जलदगतीने करणे अपेक्षित आहे. यासाठी ठिकठिकाणच्या दौºयांचे नियोजन युद्धपातळीवर करून विनाविलंब घटनास्थळ वेळीच गाठण्यासाठी गाड्या खरेदीचा हट्ट असल्याचे सांगितले जात आहे. गाड्या खरेदीचा हा ठराव पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्राधान्याने मांडण्याचे निश्चित झाले आहे. ‘घसारा’ निधीतून या नवीन गाड्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.या खरेदीस सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे अपेक्षित आहे. यानुसार, ठराव मांडून त्यास मान्यता घेऊन मनपसंत नव्या गाड्या खरेदीचा मार्ग मोकळा करण्याचा हा प्रयत्न आहे. या ठरावासाठी माजी पदाधिकाºयांच्या मार्गदर्शनासह अधिकाºयांचा सल्लादेखील घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.पदाधिकाºयांच्या सध्या रस्त्यावर धावत असलेल्या गाड्या तशा फार जुन्या नाहीत; परंतु या गाड्या जादा धावल्यामुळे पदाधिकाºयांसाठी नव्या गाड्यांची गरज असल्याची चर्चा आहे. जिल्हा विभाजनाआधीच्या पदाधिकाºयांसाठी सध्याच्या गाड्या नव्याच घेतल्या होत्या, असेही जाणकारांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींना गाडी नसल्यामुळे त्या सध्या विभागाच्या अधिकाºयाच्या गाडीचा वापर करत आहेत.पंचायत समित्यांचे सभापती व गटविकास अधिकारी या दोघांसाठी एकच वाहन वापरले जात आहे; पण सभापतींसाठी नवी गाडी खरेदी करण्यासाठी शासनाने आधीच परवानगी दिली आहे. त्यामुळे या गाड्या मिळणार आहे.