शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या बसला अपघात; १७ जण झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:02 IST

भिवंडीनजीकची दुर्घटना

भिवंडी : रात्रपाळीसाठी कामगारांना अ‍ॅमेझॉन कंपनीत कामावर घेऊन जाणाऱ्या भरधाव खाजगी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने बसमधील १७ कामगार जखमी झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली गावाच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. यामध्ये १० जण किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सात जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तालुक्यातील वडपे येथे असलेल्या अमेझॉनच्या गोदामातील हे कामगार असून, कामावर येण्याजाण्यासाठी त्यांना खाजगी बससेवा पुरवली जाते. रविवारी रात्रपाळीत काम करण्यासाठी भिवंडी शहरातील जुना जकातनाका येथून कामगारांना घेऊन रात्री ९ वाजता खाजगी बस निघाली.मुंबई-नाशिक महामार्गावरील सरवली येथे बसचालकास रस्त्यात उभा असलेला कंटेनर दिसला नाही. त्यामुळे झालेल्या अपघातात १७ कामगारांच्या डोक्याला, छातीला, चेहºयाला मार लागला आहे. सर्व जखमी कामगारांना टेमघर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील सात जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले आहे.मुदतबाह्य बसकडे दुर्लक्ष : भिवंडी शहरातून दररोज सुमारे ५० हून अधिक खाजगी बस कामगारांची ने-आण करत आहेत. या बसमध्ये अनेक बस मुदतबाह्य झाल्या आहेत. तसेच प्रशिक्षित चालकही नसून बसमध्ये अधिक संख्येने कामगार बसवून प्रवास केला जात आहे. मात्र, स्थानिक वाहतूक पोलीस व ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.