शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:45 AM

जागोजागी कचऱ्याचे ढीग; वेतन न मिळाल्याने उचलले पाऊल

कल्याण : डेंग्यूसारख्या साथीच्या आजाराने पूर्वेतील भागात थैमान घातले असताना दुसरीकडे वेतन न मिळाल्याने कंत्राटदाराच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे येथील ‘ड’ आणि ‘जे’ प्रभागांत कचºयाचे ढीग पाहायला मिळाले.स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत केडीएमसीकडून स्वच्छता राखण्याचा दिंडोरा पिटविला जात असताना वेतन थकल्याने तसेच ते अत्यल्प मिळत असल्याच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे स्वच्छतेच्या उपक्रमालाच एक प्रकारे हरताळ फासला गेला. केडीएमसीतील १० पैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा संकलनासाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यात पश्चिमेतील ‘ब’, ‘क’ तर, पूर्वेतील ‘ड’, ‘जे’ प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागांतील रहिवाशांच्या घरातील कचरा कंत्राटदाराच्या कामगारांकडून गोळा केला जाणार असल्याने कचराकुंड्यांची आवश्यकता भासणार नाही, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला होता. परंतु, नेमकी उलटी परिस्थिती पाहायला मिळत असल्याने कचराकुंडीमुक्त प्रभाग हे उद्दिष्ट कागदावरच राहिले आहे.केडीएमसीच्या परिवहन विभागात नेहमीच कर्मचाºयांच्या वेतनाची बोंबाबोंब असते. परंतु, आता घनकचरा व्यवस्थापन विभागातही हे चित्र दिसत आहे. कचरा संकलन व वाहतुकीसाठी नेमलेल्या कंत्राटदाराच्या चालक व कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. जे मिळते तेही अपुरे आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी पूर्वेतील ‘जे’ आणि ‘ड’ प्रभागांतील संबंधित कर्मचाºयांनी सकाळच्या सत्रात कचरा उचलला नाही. त्यामुळे जागोजागी कचºयाचे ढीग जमा झाले होते.१७ मे २०१९ पासून खाजगी कंत्राटदारामार्फत कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले. ‘जे’ आणि ‘ड’ प्रभागांत कंत्राटदाराचे १५० कर्मचारी आहेत. यातील सफाई कामगारांना १३ हजार वेतन मिळते, तर मोठे वाहन चालविणाºयाला १५ हजार, तर घंटागाडीच्या चालकाला १४ हजार वेतन मिळते. बायोमेट्रीक हजेरीनुसार त्यांचे वेतन काढले जाते. परंतु, वेतन हे अत्यल्प मिळते, असा कर्मचाºयांचा आरोप आहे. तसेच वेतन वेळेवरही मिळत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ त्यांनी गुरुवारी हे आंदोलन केले.दुसºया सत्रात काम सुरूबायोमेट्रीक प्रणालीच्या हजेरीतील नोंदीनुसार कर्मचाºयांना वेतन दिले जाते. परंतु, काहींचे लेटमार्क लागत असल्याने त्याप्रमाणेच वेतन अदा केले जात आहे. बायोमेट्रीकला कर्मचाºयांचा विरोध आहे. त्यात वेतन मिळत नाही, अशीही त्यांची तक्रार आहे. येत्या दोन दिवसांत वेतन अदा केले जाणार आहे. सकाळच्या सत्रात कामबंद केले होते. परंतु, दुपारी दुसºया सत्रात कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, असे कंत्राटदाराचे सुपरवायझर नारायण घोडके यांनी सांगितले.