शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ नगरपालिकेत पावसाचे पाणी शिरल्याने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

अंबरनाथ : मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयतदेखील पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ ...

अंबरनाथ : मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयतदेखील पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. यात काही दालनांमधील महत्वाच्या फाइलदेखील भिजल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तर भंडार विभागातील अनेक सामान पाण्याखाली आले आहे.

सकाळी ११ वाजताच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरील नाला ओसंडून वाहत होता. त्यातच पाण्याचा प्रवाह बंद असल्याने हे संपूर्ण पाणी थेट नगरपालिका कार्यालयात शिरले. त्यामुळे नगराध्यक्ष दालन, मुख्याधिकारी यांचे कार्यालय, अतिरिक्त मुख्याधिकारी दालन, घरपट्टी विभाग, भांडार विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, विद्युत विभाग आणि महिला बाल कल्याण विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अचानक हा प्रकार घडल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या फाइल आणि सामानदेखील हलवता आले नाही. पाण्याची पातळी वाढत असल्याने तत्काळ भांडार विभागातील महत्त्वाचे साहित्य टेबलावर ठेवून जास्तीत जास्त सामान वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर घरपट्टी विभागामधील काही फाइल पाण्यात भिजल्या होत्या. मुख्य अधिकारी आणि अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या दालनातदेखील पाणी गेल्याने ते बाहेर काढण्याचे काम कर्मचारी करीत होते. अचानक पाणी शिरल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा हा शहरातील पाणी साचलेल्या भागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करीत आहे.

---------फोटो