शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

साकेत पुलाचे काम आज पूर्ण

By admin | Updated: June 5, 2016 03:09 IST

येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर त्याच पुलावरील मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम

ठाणे : येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाच्या नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात पूर्ण झाल्यानंतर त्याच पुलावरील मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम आठवडाभरात मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे या लेनवरील वाहतूक येत्या रविवारी सुरू करण्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत करण्यात आला आहे. या पुलाच्या तातडीने हाती घेतलेल्या दोन्ही लेनचे काम पावसाळ्यापूर्वी म्हणजे अवघ्या १५ दिवसांत पूर्ण होणार असल्याने या पुलाचे आयुष्यमान वाढण्यास मदत झाली आहे. तसेच भविष्यात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागणार नाही. साकेत पुलावरील नाशिकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनचे काम २१ मे रोजी तातडीने सुरू झाले. या वेळी पुलावरील अतिरिक्त डांबरी थर, जॉइंट पट्टी काढण्याबरोबर काँक्रिट फोडून तेथे नवीन स्ट्रीलच्या पट्ट्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या वेळी त्या पुलाच्या दोन बेअरिंग गेल्याचे समोर आले. हे सर्व काम घेतलेल्या मुदतीच्या आत म्हणजे अवघ्या सात दिवसांत पूर्ण झाले. या कामासाठी वाहतूक वळवण्यात आल्याने मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेऊन ते काम ३१ मे रोजी सुरू झाले. (प्रतिनिधी) या लेनचे आतापर्यंत सहा जॉइंटचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन जॉइंटचे काम सुरू आहे. डांबराचा दोन इंचांचा डीबीएमचा थर टाकून झाला असून उर्वरित एक इंचाचा डीसी थर टाकणे बाकी आहे. दोन जॉइंट जोडल्यावर काँक्रिटीकरण झाल्यावर डांबराचा थर टाकण्यात येणार आहे. ही कामे रविवारी पूर्ण होतील आणि त्याच दिवशी ही लेनही वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.