शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोड प्रकल्पाचे काम भूसंपादनापूर्वीच सुरू, रस्ता अडचणीत येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:20 IST

कल्याण-डोंबिवली शहरातील रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही. असे असतानाही एमएमआरडीएने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही. असे असतानाही एमएमआरडीएने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली आहे. भविष्यात ज्यांची जमीन बाधित होणार आहे, त्यांच्याकडून जमीन देण्यास नकार दिला जाऊ शकतो किंवा जास्तीचा मोबदला मागितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करणे अडचणीचे ठरू शकते.कल्याण-डोंबिवलीत ३२ किलोमीटरचा रिंग रोड प्रकल्प ८०० कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे. त्यासाठी १२४ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यात २४ गावांची जमीन बाधित होणार आहे. आतापर्यंत २१ गावांतील जमिनीची मोजणी पार पडली आहे.हा रस्ता हेदूटणे ते शीळ, शीळ ते मोठागाव, मोठा गाव ते दुर्गाडी, दुर्गाडी ते गांधारे, गांधारे ते बारावे आणि बारावे ते टिटवाळा या सहा टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. त्यापैकी दुर्गाडी ते गंधारे या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदार नेमला आहे. त्यानंतर गांधारे ते बारावे, बारावे ते टिटवाळा या दोन टप्प्यांना हात घातला जाणार आहे. दुर्गाडी ते टिटवाळा पर्यंत २५० कोटी रुपये खर्चाचे काम आहे. पहिल्या टप्यातील रिंगरोडच्या कामासाठी ७० टक्केच जमीन संपादित करून झालेली आहे, असे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून सांगण्यात आले. एकूण प्रकल्पासाठी १२४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी केवळ ४० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित ६० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया बाकी आहे.महापालिकेने भूसंपादनाचे काम ठोकपागारी कंत्राटी कामगारांना दिले आहे. महापालिकेच्या भूसंपादन विभागाने रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार ४५३ जणांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. अनेकांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. अनेकांना नोटिसा पाठविताना त्यांचे पत्ते नीट नाहीत. त्यामुळे नोटीस योग्य पत्त्यावर योग्य बाधित व्यक्तीलाच गेली आहे की नाही, याची हमी मिळत नाही. त्यामुळे नोटिसा मिळूनही काही जणांकडून थंड प्रतिसाद आहे. त्यापैकी काही जणांना टीडीआर हवा आहे. त्यांनी त्यांचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहे. काहींना टीडीआर नको आहे, त्यांनी तसे कळविले आहे.प्रकल्पासाठी संपादन कराव्या लागणाºया एकूण १२४ हेक्टर जागेपैकी ३३ हेक्टर जागा ही सीआरझेडमध्ये येत होती. राज्य सरकारने सीआरझेडमधील जागा संपादित करण्याचा मार्ग मोकळा करून त्याचा एक अध्यादेश १४ मार्च २०१७ मध्ये काढला आहे. एखाद्या सीआरझेडमधील जमीन मालकाने भूसंपादनास सहमती दर्शविल्यास त्याला एक हजार मीटर जागेच्या बदल्यात एक हजार मीटर जागेचा टीडीआर दिला जाणार आहे. त्यामुळे सीआरझेडचा मुद्दाही निकाली निघाला आहे. भूसंपादन न करता प्रकल्पाचे काम सुरू केल्याने ज्यांना जमीन द्यायची इच्छा नाही, अशांकडून जादा मोबदल्याची मागणी केली जाऊ शकते. त्यासाठी प्रकल्पाची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यातील निविदा काढताना पहिल्या टप्प्याचा मार्ग हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचºयाखाली गाडला गेलेला आहे. त्यावर १२ लाख मेट्रीक टन कचरा आहे. तो दूर केल्याशिवाय प्रकल्पाची वाट मोकळी होऊ शकत नाही.>आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा : रवी पाटीलशिवसेनेचे उपशहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, एमएमआरडीएचे रिंगरोड प्रकल्पाच्या कामाचे नियोजन नाही. आधी जमीन संपादन करण्याऐवजी जमीन ताब्यात नसताना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढून घाई गडबडीत कामाला सुरुवात केली आहे. काही जमीन मालकांनी स्वत:हून पुढे येऊन जमीन देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यांचे प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना खात्याकडे पडून आहे. त्यावर आयुक्तांकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. टीडीआर प्रस्ताव निकाली काढले जात नाही. टीडीआरच्या फाइल्स कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाकडे पडून आहेत. त्यावर आयुक्त पी. वेलरासू यांनी तातडीने निर्णय घ्यावा. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका