भार्इंदर : येथील भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांचा मीरारोडमधील शगुन बंगला, बेवर्ली पार्क येथील सेव्हन स्क्वेअर अॅकडमी शाळेतील कार्यालय, घोडबंदर येथील सी अॅन्ड रॉक हॉटेल आदी ठिकाणी आयकर विभागाने गुरुवारी (२१ जानेवारी) दुपारच्या सुमारास धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी सुरु केल्याचे सूत्रांकडुन सांगण्यात आले आहे. ही धाड आयकर विभागाच्या पुणे कार्यालयामार्फत टाकल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वीही त्यांच्या घरासह कार्यालयांवर आयकर विभागाच्या अंदाजे दोन वेळा धाडी पडल्या होत्या. त्यावेळी विभागाच्या पथकाला कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. यंदाची धाड पुणे आयटी कार्यालयाकडून टाकण्यात आल्यास त्याला मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेच्या नोंदणीवेळी मुद्रांक व नोंदणी शुल्काचा अपहार तर दुसऱ्या बाजूला मुंबई कार्यालयाने धाड टाकल्यास त्याला मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन कंस्ट्रक्शनस् कंपनीने बांधकामासाठी वापरलेला अमर्याद टीडीआर कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय तसेच शहरवासियांत सुरु झाली आहे. या संदर्भात मेहता यांच्याशी संपर्क साधला असता प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
नरेंद्र मेहतांच्या बंगल्यासह कार्यालयावर धाडी
By admin | Updated: January 22, 2016 02:08 IST