शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट, मनसेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 19:39 IST

अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याण-डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणा-या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याचा पर्दाफाश मनसेच्या वतीने आज करण्यात आला आहे. खड्डे योग्य प्रकारे बुजविण्यात यावेत. हे काम येत्या दोन दिवसात करण्यात यावे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने दिला आहे.महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्याच्या कामावर महापालिकेकडून 17 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही रक्कम वर्षभर खड्डे बुजविणे व रस्ते दुरुस्तीच्या कामावर खर्च केले जाणे अपेक्षित आहे. पावसाळ्य़ात रस्त्यावर खड्डे पडले होते. भर पावसात खड्डे बुजविण्याचे काम करता येत नाही, असे कारण प्रशासनाकडून दिले जात होते. तसेच ज्या ठिकाणी खड्डे बुजविले गेले आहेत. त्या कामाचे बिल महापालिकेने संबंधित कंत्राटदारांना दिलेले नाही. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पुलाचे नव्याने बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्व पश्चिमेची वाहतूक ही ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलावरून सुरू आहे.या पुलाच्या दिशेने जाणा-या डोंबिवली पूर्वेतील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले आहे. हे खड्डे महापालिकेने बुजविले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेली खडी, डांबर हे निकृष्ट दर्जाचे आहे. ते हाताने उकरले तर निघते. हे वास्तव दाखविणारा व्हिडीओ मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी तयार केला असून, तो सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. पावसाने उघड घेतली आहे. तरीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने योग्य प्रकारे केलेले नाही. महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामात थुकपट्टीचे काम केले आहे. महापालिकेने येत्या दोन दिवसांत योग्य प्रकारे खड्डे बुजविले नाही तर मनसेच्या वतीने आांदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.