शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महिला स्वच्छतागृहे आवश्यकच

By admin | Updated: March 5, 2017 03:28 IST

कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात स्त्रिया घराबाहेर पडतात. तेथे जशा त्या सुरक्षितह असाव्या लागतात. तितकीच स्वच्छतागृहासारखी त्यांची प्राथमिक गरज भागवण्याची

ठाणे : कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात स्त्रिया घराबाहेर पडतात. तेथे जशा त्या सुरक्षितह असाव्या लागतात. तितकीच स्वच्छतागृहासारखी त्यांची प्राथमिक गरज भागवण्याची सुविधा उपलब्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नोकरीधंदा करणाऱ्या महिलांमुळेही शहराच्या आर्थिक विकासात भर पडते. अशा महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे असावी. नव्हे, असलीच पाहिजेत, असे मत ‘कोरो’ -‘राइट टू पी’च्या समन्वयक सुप्रिया सोनार यांनी मांडले. केवळ तंत्रज्ञानाने विकसित झालेले शहर स्मार्ट नसते, तर स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक असे शहर स्मार्ट ठरते, असेही त्या म्हणाल्या.ठाणे महापालिका नागरिकांच्या सूचना समजावून घेऊन त्याचा समावेश अर्थसंकल्पात करणार आहे. शहराच्या लोकसंख्येत निम्म्या प्रमाणात असलेल्या महिलांची ही मागणी प्राधान्याने पूर्ण व्हायला हवी, यावर त्यांनी भर दिला.ठाणे, मुंबईसारख्या मोठ्या महानगरांत नोकरी करणाऱ्या महिलांची चौथी पिढी आहे. त्यातही केवळ सहा टक्के महिला या कार्यालयांत नोकरी करतात. सुमारे ९४ टक्के महिला कचरावेचक, पेपरविक्री, साफसफाई, मजुरी अशी कामे करतात. अशा महिलांना दिवसभरात स्वच्छतागृहाची आवश्यकता अधिक भासते. मात्र, ती उपलब्ध असतेच, असे नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावी. मोठ्या महानगरांमध्ये साधारणत: दर दोन किलोमीटरवर एक स्वच्छतागृह असावे, अशी अपेक्षा आहे. शहराची एकूण लोकसंख्या, त्यातील महिलांचे प्रमाण, त्यात्या विभागातील महिलांची रहदारी यानुसार ही मागणी बदलू शकते, असे सोनार यांनी सांगितले. स्वच्छतागृहांसाठी जागा सुचवताना किंवा ठरवताना अर्थातच त्या परिसरातील लोकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. फुटपाथ म्हणजे लोकांच्या ‘राइट टू वॉक’चा हक्क असल्याने फुटपाथवरील जागा सुचवली जाऊ शकत नाही. प्रभागातील एखाद्या जागेला स्थानिक लोकप्रतिनिधींचाही विरोध असू शकतो. अशा वेळी ज्यांच्यासाठी स्वच्छतागृहे बांधली जात आहेत, त्यांनी यासाठी एकत्र यावे. त्यानंतर, प्रभाग अधिकाऱ्यांनी पाहणी करून आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्याला मंजुरी दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. आपल्याकडे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. पुरुष आणि महिलांसाठी एकत्रितच असतात. त्यातही महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत ५० टक्केही नसते, अशी अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)तीन वर्षांनंतरही निराशा : मुळात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधायची म्हटले की, त्याला कोणी नाही म्हणत नाही. आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतागृहासाठी काम करताना नगरसेवक, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि मुख्यमंत्री असा प्रवास झाला. गेली तीन वर्षे सतत जेंडर बजेटमध्येही यासाठी तरतूद झाली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही, याचा खेद वाटतो. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांच्या गरजा लक्षात घेत स्वच्छतागृहे उभारावी, असे सोनार यांनी स्पष्ट केले. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रतिक्रियाठाणे : श्रीरंग, वृंदावन या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा दरवर्षी पावसाळा आला की, चर्चिला जातो. स्थानिक नागरिक प्रशासनाकडे धाव घेतात. मात्र, त्याबाबत योग्य तो निर्णय झाला पाहिजे. वृंदावन ते ठाणे स्टेशन मार्गासह वृंदावन ते मुलुंड चेकनाका मार्गावरील बसच्या फेऱ्याही वाढवल्या पाहिजे.- ऋता बुरकुले, प्रभाग क्रमांक-११ शहराचे मध्यवर्ती आणि गजबजलेले ठिकाण म्हणून मासुंदा तलाव आणि जांभळीनाका परिसर ओळखला जातो. मात्र, तलाव तसेच जांभळीनाका परिसरात गर्दुल्ले, वेश्यांचा मोठा वावर असतो. सायंकाळच्या दरम्यान परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले, तरी त्यांचा त्रास होतो. तसेच या परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय शोधणे गरजेचे आहे. पार्र्किं गसाठी विशेष पार्र्किं ग झोन तयार करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजे. - राजेश सावंत, प्रभाग क्रमांक-२१परिसरात पदपथांवर दिवे लावण्याची गरज आहे. येथे रस्त्यावर धंदा थाटून बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे रस्ता अडला जातो. संध्याकाळच्या वेळी तर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देऊन रस्ता वाहतूक आणि रहदारीसाठी मोकळा ठेवला पाहिजे. प्रभागातील बैठ्या चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे.- पराग वायदंडे, प्रभाग क्रमांक-१५कळवानाका परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय शोधण्याची गरज आहे. कळवा हॉस्पिटलच्या परिसरात कायम वर्दळ असते. मात्र, कळवा ते ठाणे रेल्वे स्थानक मार्गावर धावणाऱ्या टीएमटी बसची संख्या आणि फेऱ्याही तुलनेने कमी आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांची मुजोरी वाढते. मात्र, टीएमटीच्या फेऱ्या वाढल्या तर अनेकांना फायदा होईल. रिक्षांसाठी स्टॅण्ड असूनही अयोग्य पद्धतीने त्या रस्त्यात मध्येच थांबवल्या जातात. परिणामी, अनेकदा अपघातांचे प्रकार घडतात. या मुजोर रिक्षाचालकांवर अंकुश ठेवला पाहिजे. - अलका राऊत, प्रभाग क्रमांक-२३