शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नशेखोरांविरोधात महिलांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगरमधील नगरसेवक, समाजसेवक, महिला व नागरिकांनी एकत्र येत ‘नशेखोरांविरोधात एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगरमधील नगरसेवक, समाजसेवक, महिला व नागरिकांनी एकत्र येत ‘नशेखोरांविरोधात एक लढा’ असे आंदोलन उभे केले. त्यासाठी महिलांचे एक पथक तैनात केले असून, त्यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी मार्गदर्शन केले.

उल्हासनगरसह सम्राट अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांमध्ये काही नशेखोर तरुण बसतात. त्यांच्याकडून दारू, अंमली पदार्थाचे सेवन करणे, जोरजोराने ओरडणे, शिवीगाळ करणे, महिला व तरुणींना छेडणे, आदी प्रकारात वाढ झाल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. अशांना आळा घालण्यासाठी रगडे यांनी सम्राट अशोकनगर येथून ‘एक लढा नशेखोराविरोधात’ या आंदोलनाची सुरुवात केली आहे. त्यांनी स्थानिक नगरसेवक, समाजसेवक, महिला व नागरिकांना विश्वासात घेतले.

येथील महिला पथकासह नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर हे सोमवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित होते. त्यांनी शहरातील प्रत्येक विभागात असा लढा उभे राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच पोलीस तुमच्या सोबत असतील, असे आश्वासन दिले. या मार्गदर्शन कार्यक्रमाला समाजसेवक शिवाजी रगडे, रिपाइं नेते महादेव सोनवणे, नगरसेविका सविता तोरणे-रगडे, दशरथ चौधरी, गौतम ढोके, रामेश्वर गवई, सुनील खांडेकर, प्रवीण वासनिक यांच्यासह स्त्रीशक्ती पथकांच्या महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.