शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेच्यावतीने गडकरी रंगायतन येथे रंगणार महिला महोत्सव, भारत गणेशपुरे यांची प्रमुख उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 16:37 IST

विविध कार्यक्रमांनी रविवार ९ डिसेंबर रोजी महिला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेच्यावतीने महिला महोत्सवमहोत्सवाचे सहावे वर्षेअभिनेते भारत गणेशपुरे यांची मुलाखत

ठाणे : प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी, ठाणेच्यावतीने रविवार ९ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ९.४५ ते दुपारी २ यावेळेत महिला महोत्सवाचे आयोजन केले आहे. हे या महोत्सवाचे सहावे वर्षे असून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. एकपात्री, पोवाडा, वक्तृत्व, कडधान्य ओळखणे, संगीत खुर्ची आणि पाककला या सहा स्पर्धा ठाणे, चेंबुर, अंबरनाथ, भिवंडी अशा विविध ठिकाणी जाऊन घेण्यात आल्या. तसेच, ठाण्यातील विविध शाळा ही या स्पर्धांत सहभागी होत्या.सामान्य महिलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या या उपक्रमाला सर्व महिलांनी सहभागी होऊन भरभरु प्रतिसाद दिला. जवळपास ६०० च्या आसपास महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा. विविध मंगळागौरीचे खेळ, सोलापूरच्या अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘नाती कशी जपावी’ यावरील व्याख्यान आणि अभिनेते भारत गणेशपुरे यांची डॉ. अरुंधती भालेराव घेणार असलेली मुलाखत असे स्वरुप या महोत्सवाचे आहे. प्रारंभ आणि ठाणे परिसरातील आदीवासी पाडे, गरिब वस्ती अशा ठिकाणी असणाºया मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू करत आहेत. या मोबाईल व्हॅनमध्ये शिक्षक, जे मुलांपर्यंत पोहोचून त्यांना वाचनाची गोडी लावतील, गोष्टी सांगतील, खेळ घेतील. या व्हॅनमध्ये दोन स्क्रीन्स आहेत. ज्या मार्फत पाड्यांमध्ये जिथपर्यंत नाटकं पोहोचत नाहीत, तेथील मुलांना प्रारंभची बालनाट्य स्क्रीनवर पाहता येतील. आदीवासी पाड्यांतील महिलांसाठी स्त्रीरोग विषयक आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले जाते. या व्हॅनमध्ये अशा प्रकारच्या तपासणीसाठीची सुद्धा सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायीक समीर नातू, राजेश गाडगीळ, पितांबरीचे व्यस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाईल, भूमी वर्ल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश पटेल, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, सुप्रिया पाठारे आणि राणी गुणाजी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक