शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा मोर्चा अफवाच ठरली

By admin | Updated: June 30, 2017 02:44 IST

नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. अशा वातावरणात गुरुवारी सकाळपासून नेवाळी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पोलीस विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहिला आहे. अशा वातावरणात गुरुवारी सकाळपासून नेवाळी आणि परिसरातील महिला अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच तहसीलदार कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले होते. नेवाळीत शेतकऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस आणि शेतकरी यांच्यातील तणाव आणखीनच वाढला आहे. त्यातच सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नसल्याने आता येथील ग्रामस्थ आणखी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच, आपल्या मागण्या सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी नेवाळी आणि परिसरातील सर्व गावांतील महिला या तहसीलदार कार्यालयावर दुपारी ३ वाजता मोर्चा काढणार आहेत, असा मेसेज सर्वत्र फिरला होता. अनेक सोशल ग्रुपवरही हा मेसेज आला होता. यासंदर्भात तहसीलदार प्रशांत जोशी यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारच्या मोर्चाचे कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, अचानक मोर्चा धडकलाच, तर गोंधळ होऊ नये, यासाठी या मोर्चाची कल्पना पोलिसांना देण्यात आली. मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसली, तरी तणावाचे वातावरण पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांनीदेखील पोलिसांचा मोठा ताफा तहसीलदार कार्यालयात बंदोबस्तासाठी पाठवला. दुपारी ३ वाजता मोर्चा येणार, असा संदेश असल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली होती. सुरक्षेचे सर्व उपाय योजले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांनी या मोर्चाची वाट पाहिली. मात्र, महिलांचा मोर्चा न आल्याने पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला. अखेर, महिलांचा मोर्चा ही एक अफवा असल्याचे समोर आले.