शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘शेअर्स‘मध्ये पैसा लावून महिला २७ लाखांना फसली

By जितेंद्र कालेकर | Updated: April 3, 2024 21:50 IST

वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात गुन्हा, आयपीओ खरेदीचेही आमिष

ठाणे: सोशल मीडियावर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ४४ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पाेलिसांनी बुधवारी दिली.

या घटनेतील तक्रारदार ४४ वर्षीय महिला या ठाण्यातील रघुनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. दाेन अनाेळखींनी तिला १० जानेवारी ते फेब्रुवारी २४ या कालावधीत इन्स्टाग्राम अकाउंट व मोबाइलवर मॅसेज करून ऑनलाइन शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास मोठा परतावा मिळेल, अशा बतावणीचा मेसेज पाठविला. त्यासाठी एक लिंकही तिला पाठविण्यात आली.

त्याच लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगितले.त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून शेअर खरेदीच्या नावाखाली २७ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, काेणताही परतावा किंवा मुद्दल रक्कम परत न करता, तिची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ एप्रिल २४ राेजी वागळे इस्टेट पाेलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेfraudधोकेबाजी