शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचारांकडे गांभीर्याने पाहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:01 IST

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती

ठाणे : हल्लीच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असून या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे. याकरिता सरकारने आवश्यक तेवढा कडक कायदा आणला, तर आमचे त्याला पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही बुधवारी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीनिमित्ताने ठाण्यात दिली.

सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती ठाणे यांच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याला फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, हिंगणघाटपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची मालिका सुरू आहे. हा राजकारणाचा विषय नाही, गंभीर विषय आहे. त्यामुळे सरकारने अशा घटनांचा गांभीर्याने विचार करावा. सरकारने कडक कायदा करताना कुुठेतरी त्याची जरब गुन्हेगारांवर दिसली पाहिजे. सातत्याने बलात्कार, जाळून टाकण्याच्या तसेच अ‍ॅसिड फेकण्याच्या घटना घडत आहेत. ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले होते, त्या प्रकारे आताही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. सरकारने याकरिता काही पावले उचलली, तर भाजपाचे सहकार्य असेल, असेही ते म्हणाले. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न सरकारने करावामाजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी फडणवीस म्हणाले, मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली. त्याचे जिओ टॅगिंगही झाले. त्याला लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने अ‍ॅवॉर्डही दिले आहे. त्याचे संपूर्ण रेकॉर्ड आमच्याकडे आहे. परंतु, असे असताना जाणीवपूर्वक जुन्या सरकारने जे केले, ते वाईट केले ते दाखविण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे. माझा या सरकारला सल्ला आहे की, जी मोठी रेषा आम्ही ओढली आहे, ती पुसण्याऐवजी आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी काम झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शंका उपस्थित करून पूर्णपणे जनतेची दिशाभूल केली जात आहे.