शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या गळ्यातील सोने खेचून पळणाऱ्या महिलांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:26 IST

दोन महिलांना पाठलाग करून काही दक्ष नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : कळवा येथील वैष्णवी बाबर या एकवर्षीय मुलीच्या गळ्यातील सोन्याचे ताबीज खेचून पळ काढणाºया अंजली काळे (२७) आणि बाली काळे (१९, रा. उस्मानाबाद) या दोन महिलांना पाठलाग करून काही दक्ष नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.कळवा येथील घोलाईनगरच्या रहिवासी माला बाबर या ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता सासू सुनीता, सासरे सुरेश तसेच मुलगी वैष्णवी हिच्यासह घोलाईनगरच्या आठवडाबाजारामध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदी करण्यात ही सर्व मंडळी गर्क असताना वैष्णवी तिच्या आजीसमवेत होती. त्यावेळी तिघेजण अपर्णा अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर आले. तेव्हा त्यांच्यामागून दोन अनोळखी महिला आल्या. त्यातील एकीने सुनीता यांना धक्का मारला. तर, दुसरीने वैष्णवीच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाचे सुमारे साडेतीन हजारांचे सोन्याचे ताबीज खेचून तिथून पळण्याचा प्रयत्न केला.या प्रकारानंतर सुनीता बाबर यांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजारातील काही लोकांनी प्रसंगावधान राखून अंजली आणि बाली या दोन्ही महिलांना पकडले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून अंजली हिच्याकडील सोन्याचे ताबीजही पोलिसांनी हस्तगत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर याप्रकरणाचा तपास करीत आहेत.