शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करण्यातही महिला पिछाडीवरच

By admin | Updated: February 23, 2017 06:06 IST

ठाणे महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत एक महिला जास्तीची निवडून जाणार आहे. शिवाय, यंदाचे

ठाणे : ठाणे महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत एक महिला जास्तीची निवडून जाणार आहे. शिवाय, यंदाचे महापौरपद महिलेसाठी राखीव झाले असल्याने ठाणे महापालिकेच्या सत्तेवर महिलाराज येणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापालिकेतदेखील सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना समान संधी दिली. असे असले तरी मतदान करण्यात मात्र महिला आजही पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महापालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानामध्ये पुरु षांच्या तुलनेत ६६ हजारांपेक्षा कमी मतदान महिला मतदारांचे झाले आहे. मात्र, दुसरीकडे महिला मतदानाचा टक्का निवडणुकीमध्ये वाढला नसल्याने मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का वाढायला हवा, अशी अपेक्षा महिलांनीच व्यक्त केली आहे.या निवडणुकीमध्ये ३५९ महिला रिंगणामध्ये आहेत. महिलांना उमेदवारी देण्यामध्ये भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्र मांक ३, १२, १५, २९ आणि ३३ या प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. यामध्ये काही विद्यमान नगरसेविकांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या वतीने ११९ जागांवर उमेदवार उभे केले असून यामध्ये तब्बल ६७ महिला उमेदवार आहेत, तर ५३ पुरु ष उमेदवार आहेत. काही पुरुष प्रभागांमध्येही महिलांना संधी दिली आहे. भाजप १२० जागांवर निवडणूक लढत असून त्यांनी ६३ जागांवर महिला उमेदवार दिले आहेत. मनसे देखील महिलांना उमेदवारी देण्यात पिछाडीवर नसून त्यांनी १११ जागांपैकी ५४ जागी त्यांना संधी दिली आहे, तर ५७ जागी पुरु ष उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी ८७ जागी निवडणूक लढवत असून त्यांनी ४५ जागी पुरु ष, तर ४२ महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या ६० पैकी २८ महिला उमेदवार आहेत. मतदान नोंदणीतही पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमीच आहे. (प्रतिनिधी)