शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:46 IST

भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडून उल्हासनगरच्या पवई चौकात बुधवारी सकाळी महिलेचा चिरडून मुत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी टँकरचालक गोविंद गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे

उल्हासनगर : भरधाव पाण्याच्या टँकरखाली चिरडून उल्हासनगरच्या पवई चौकात बुधवारी सकाळी महिलेचा चिरडून मुत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी टँकरचालक गोविंद गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भरधाव वेग आणि खड्डयांमुळे महिलेचा बळी गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला.उल्हासनगरच्या कॅम्प नं. तीनच्या पवई चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते. तेथून सकाळी साडेदहाच्या दरम्यान पाण्याचा टँकर भरधाव जात होता. त्याचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेने पायी जात असलेल्या जया झरेकर (वय ३४) यांच्या तो अंगावरून गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या कल्याणच्या खडेगोळवली येथे राहणाºया आहेत. टँकरचालक गोविंद पळण्याच्या तयारीत होता. रहिवाशांनी त्याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. भरधाव वेग आणि रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात त्याच्याकडून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.खड्ड्यांचा विषय गाजत असल्याने आणि त्यातून दुर्घटना घडत असल्याने पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहाड फाटकाच्या रस्त्यासह इतर रस्त्यांची पाहणी पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ खड्डे भरण्याचे आदेश दिले. हे खड्डे स्वातंत्र्य दिनापूर्वी न भरल्यास रिक्षा संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्या दरम्यानच ही दुर्घटना घडली. त्यामुळे खड्डे बुजवण्याचा विषयही तापला आहे.