शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेपर्यंत चालणाऱ्या बार-डिस्को पबमध्ये महिलेचा विनयभंग आणि मारहाण

By धीरज परब | Updated: May 11, 2024 13:24 IST

नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले

मीरारोड - काशीमीरा भागातील काशिगाव पोलीस ठाणे हद्दीत पहाटे पर्यंत चालणाऱ्या बार - डिस्को पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची घटना घडली असून काशिगाव पोलीस ठाण्यात बारचा बाउन्सर आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काशिगाव येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गवर गेट सेट टुनाईट अर्थात जीएसटी ह्या नावाने डिस्को पब - ऑर्केस्ट्रा बार आहे. सदर बार मध्ये नियमित ऑर्केस्ट्रा , डान्स चालतो आणि हा बार पहाटे पर्यंत चालू असतो. 

भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर राहणाऱ्या मेकअप आर्टिस्ट श्वेता ओमप्रकाश सिंग ( २७ ) यांचा वाढदिवस असल्याने त्या मित्रासह जीएसटी पब बार मध्ये गेल्या होत्या . नाच गाणे सुरु असताना नैना ठाकूर नावाच्या महिलेने सिंग हिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली आणि तिच्या बद्दल अपशब्द वापरले . तसेच शब्बीर नावाच्या बाउन्सर ने सिंग यांना मागून येऊन पकडत विनयभंग केला . ७ मे रोजीच्या पहाटे दिड ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला . 

श्वेता सिंग यांच्या फिर्यादी नंतर ८  मे रोजी काशिगाव पोलिसांनी नैना ठाकूर व बार चा बाउन्सर शब्बीर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पालवे तपास करत आहेत . अक्षय जैन हा पब - बार चा चालक असल्याचे सांगितले जाते.

येथे हुक्का दिला जात असल्याचे तसेच पोलीस यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि सदर पब बार चे बांधकाम अधिकृत का अनधिकृत ? ह्यावर पालिका देखील चूप असल्याचे आरोप केले जातात .  पहाटे पर्यंत चालणारे हे बार - पब शहरातील सामाजिक वातावरण बिघडवण्यासह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत . ह्या आधी मीरारोडच्या कनकीया भागातील बार - पब मध्ये गुन्ह्याच्या घटना घडल्या असून त्यातही रहिवाशी सुद्धा त्रासले गेल्याचे प्रकार घडले होते .