शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

चोरांशी झालेल्या झटापटीत रिक्षातील महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 07:23 IST

Thane : चोरट्यांकडून तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रिक्षातून खाली पडून ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : मोबाइल चोरट्यांशी प्रतिकार करताना कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून ३१ वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता रिक्षा प्रवासादरम्यान ठाण्यातील कन्मिला रायसींग (२७) या महिलेलाही अशाच प्रकारे बुधवारी रात्री जीव गमवावा लागला आहे. चोरट्यांकडून तिचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच रिक्षातून खाली पडून ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत राहणारी लालचुरसांगी फॅन्चुन (३०, रा. कलिना, सांताक्रुझ) ही तिची मैत्रीण कन्मिला हिच्यासह ठाण्यातील विवियाना मॉल येथून ९ जून रोजी रात्री ७.५० वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरील तीनहातनाका येथील ओपन जीमजवळील रस्त्याने मुंबईकडे रिक्षातून जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवरून 

दोघे जण त्यांचा पाठलाग करीत आले. त्या दोघांनीही रेनकोट घातलेला होता. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्याने कन्मिला हिच्या हातातील मोबाइल जबरीने हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. हा हिसका इतका जोरदार होता की, हा मोबाइल त्याच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न सुरू असताना ती तोल जाऊन खाली कोसळली. यात डोक्याला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, तासाभरानेच तिचा मृत्यू ओढवला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने भिवंडीतून गुरुवारी अल्केश परवेझ मोमीन अन्सारी (२०) आणि सोहेल अन्सारी (१८, रा. दोघेही भिवंडी) या दोघांना तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या आधारे अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे