शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यातून मांडल्या सफाई कामगारांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:55 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : ‘स्वच्छ आणि सुंदर डोंबिवली’वर टाकला प्रकाश

डोंबिवली : स्मार्ट सिटीअंतर्गत ‘स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली’ ही संकल्पना घेऊन पूर्वेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी सफाई कामगारांची व्यथा मांडली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या सवयींवर या देखाव्यातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले आहे. सफाई कामगारदेखील माणूस असून सगळ्यांनी स्वच्छता राखण्याचा संकल्प करावा आणि त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ९५ वे वर्ष आहे. सातत्याने समाजहित हाच उद्देश ठेवून मंडळातर्फे श्री गणेश मंदिर संस्थानच्या मुख्य सभामंडपात देखावे साकारण्यात येतात. यंदाच्या वर्षी साकारलेल्या देखाव्यात फडके रोड, भाजीमार्केट आदी ठिकाणच्या विक्रेत्यांकडून सुशिक्षित नागरिक वस्तूंची खरेदी करताना दाखवले आहेत. माणसाच्या वाईट प्रवृत्तीमधील कचरा करण्याची, अस्वच्छता राखण्याचीही सवय यावर प्रकाश टाकला आहे. अस्वच्छतेचा कलंक पुसण्यासाठी सगळ्यांनी सामूहिकपणे जबाबदारी घ्यायला हवी, असा मंडळाचा प्रयत्न आहे. केडीएमसीने ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक केले असूनही त्याचे पालन ठोसपणे होताना दिसत नाही. महापालिकेने त्यासाठी पुरवलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या डब्यांमधून कचरा ओसंडून वाहत असल्याचे निदर्शनास येते. तसेच अस्वच्छता कशी होते, कोण करतो, त्याची माहिती देणारी ध्वनिफीत ऐकवण्यात येत असून, त्याद्वारे स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात येत आहे. स्वच्छतेचे फायदे, लाभ याची माहिती देण्यात येत आहे. स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली कधी होणार? कोण करणार, असा सवाल करत मंडळाने नागरिकांनाच विचार करायला भाग पाडले आहे. बदल केला तर होऊ शकतो, परंतु मानसिकता असायला हवी. त्यासाठी एक पाऊल स्वच्छतेकडे, असा मौलिक संदेश देखाव्यातील एका मोठ्या वाहनाद्वारे दिला आहे. अशा पद्धतीने स्मार्ट सिटीअंतर्गत कशा पद्धतीने स्वच्छ, सुंदर शहर राखता येऊ शकते, याची माहिती या देखाव्याद्वारे दिल्याची माहिती मंडळाचे सचिव सचिन कटके यांनी दिली.दरवर्षी एखाद्या विषयावर मंडळातर्फे जनजागृती केली जाते, असे कटके यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी मंडळाचे, व उत्सव समितीचे हेमंत चिंगळे हे अध्यक्ष तर आशीष चौधरी हे कोषाध्यक्ष आहेत, असे ते म्हणाले.स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘लोकमत’ ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे आणि पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र मंडळासोबत असल्याचे समाधान आहे. प्रसारमाध्यमांनीही जागृतीसाठी पुढे यावे आणि शहर स्वच्छ करण्यासाठी योगदान द्यावे, असेही कटके म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी