शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साक्ष नोंदवण्यासाठी साक्षीदाराची चक्क स्ट्रेचरवर हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:59 IST

हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली.

ठाणे : हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली.भिवंडी येथील खंडुपाड्यातील आखरी चाळीत राहणारे मोहम्मद शाहीद मुकीम अन्सारी हे बांधकाम व्यावसायिक समाजसेवाही करतात. सक्रिय समाजसेवेमुळे त्यांचे भिवंडीत काहींशी वैर निर्माण झाले होते. या वैरातून ८ जुलै २०१६ रोजी खंडुपाड्यातील एका हॉटेलसमोर चौघांनी मोहम्मद शाहीद यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही हात आणि पायावर एकापाठोपाठ एक वार केले. या मारहाणीत मो. शाहीद यांना गंभीर दुखापत झाली. फैसल अन्सार सिद्दीकी, रिजवान अहमद शकील शेख, निजामुद्दीन अब्दुल रहेमान सिद्दीकी आणि साजू समीर सिद्दीकी यांच्याविरुद्ध ९ जुलै २०१६ रोजी शांतीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी फैसल अन्सार सिद्दीकी आणि रिजवान अहमद शकील शेख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. निजामुद्दीन अब्दुल रहेमान सिद्दीकी आणि साजू समीर सिद्दीकी हे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.ठाणे न्यायालयात न्या. आर.एस. पाटील यांच्यासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी मो. शाहीद हजर झाले. दोन्ही पायांना प्लास्टर असल्याने मो. शाहीद चालू शकत नाही. त्यामुळे ते स्ट्रेचरवर झोपून न्यायालयासमोर हजर झाले. साक्ष नोंदवताना त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. सहायक सरकारी वकील विनीत कुळकर्णी आणि अ‍ॅड. सुनील लसणे यांनी या वेळी काम पाहिले. प्लास्टर लावलेल्या अवस्थेत स्ट्रेचरवर झोपून नोंदवलेली साक्ष चर्चेचा विषय होती.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे