शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांतच गडगंज

By admin | Updated: February 16, 2017 02:06 IST

मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे.

ठाणे : मागील पाच वर्षांत काही नगरसेवकांच्या मालमत्तेत तीन ते पाचपट अशी घसघशीत वाढ झाल्याचे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रांतून स्पष्ट झाले आहे. मागील कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले-आता शिवसेनेत दाखल झालेले नाना ऊर्फ देवराम भोईर, नजीब मुल्ला आणि माजी महापौर एच.एस. पाटील यांच्यासह काही कोट्यधीश नगरसेवकांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागणार आहेत. ज्येष्ठ नेते देवराम भोईर यांनी २०१६ मध्ये बाळकुम येथील ५१ अ या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला, तेव्हा सात कोटींची मालमत्ता दाखवली होती. अवघ्या एक वर्षात ती १२ कोटी झाली आहे. माजी महापौर एच.एस. पाटील यांची २०१२ मध्ये ३ कोटी असलेली मालमत्ता आता २०१७ मध्ये १७ कोटी इतकी झाली आहे. अपक्ष म्हणून स्वतंत्रपणे उभे राहिलेले व बिल्डर परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले उमेदवार सुधाकर चव्हाण यांच्याही संपत्तीत पाच वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ३६ कोटी म्हणजेच चारपट वाढली आहे. त्यांनी ठाणे शहर आणि परिसरात १३ कोटींची स्थावर मालमत्ता दाखवली असून त्यांच्या गाड्यांची किंमत २ कोटी आहे. तर, कुटुंबांकडील दागदागिने ७ लाखांचे आहेत. भाजपाचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या संपत्तीमध्येही लक्षणीय वाढ दिसून येते आहे. त्यांची पाच वर्षांपूर्वी ६७ लाखांची मालमत्ता आज जवळजवळ दुप्पट झालेली आहे. तर, हल्लीच भाजपामध्ये दाखल झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांची संपत्ती तब्बल ६.७४ कोटी इतकी झाली आहे. त्यांच्या गुंतवणुकीमध्ये मुरबाड येथील जमीन आणि दागदागिने आणि शहरातील काही व्यापारी जागांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व परमार आत्महत्येप्रकरणात तुुरुंगवारी करून आलेले दुसरे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्याकडे काही जमिनी, व्यावसायिक जागा आणि घरे असून त्यांची संपत्ती २०१२ मध्ये रु पये ३ कोटी होती. आता २०१७ मध्ये थेट २३ कोटी इतकी झालेली आहे. टोनी रेसिडेन्सीमधील त्यांच्या आलिशान घराचीदेखील किंमत फारच वाढली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मागील तीन वर्षांमध्ये घरांच्या किमतीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळेच त्यांच्या संपत्तीचा आकडा फुगला आहे. (प्रतिनिधी)