शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘विचारे’ मना का अफवा सोडूनि आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:20 IST

ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार

ठाणे : ठाण्यासाठी २१ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय बंद करून येत्या २१ आॅगस्टपासून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे स्थलांतरित होणार, अशी अफवा खासदार राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रामुळे पसरली. वस्तुत: पासपोर्ट सेवा देण्याचे कार्यालय ठाण्यातच सुरू राहणार आहे. केवळ प्रशासकीय कार्यालय बीकेसीत हलवण्यात येणार आहे. ऐकीव माहितीच्या आधारे विचारे यांनी हे पत्र लिहिल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पूर्वी केवळ ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या पासपोर्ट कार्यालयाशी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे ८ जिल्हे जोडले गेले. दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक पासपोर्टचे वितरण ठाणे कार्यालयाकडून केले जाते. वर्षाला साडेतीन लाखांपेक्षा अधिक पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. आता ठाणे येथील कार्यालय बंद करून मुंबई पासपोर्ट कार्यालयांतर्गत जोडण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे, असे पत्र विचारे यांनी सर्व कार्यालयांना पाठवून दिल्याने धक्काच बसला.बीकेसीमधील विदेश भवन या नवीन इमारतीत २१ आॅगस्टपासून ठाणे पासपोर्ट कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील नागरिकांना आता पासपोर्टसंदर्भात काहीही कामासाठी ३० किमी दूर बीकेसीला जावे लागेल, असा दावा विचारे यांनी केला.दरम्यान, यासंदर्भात ठाणे पासपोर्ट कार्यालयातील एका उच्चपदस्थ अधिकाºयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पासपोर्ट कार्यालय बंद होणार नाही. परंतु, कार्यालयीन कामकाज मुंबईला जाणार आहे. ठाण्यासह अन्य आठ जिल्ह्यांतून येणाºया नागरिकांना याच कार्यालयाच्या माध्यमातून पासपोर्ट वितरित होणार आहेत. परंतु, ज्यांच्यावर ‘पासपोर्ट अ‍ॅक्ट’ लागू होत असेल, म्हणजेच गुन्हेविषयक काही प्रकरणे असतील. अर्जात काही त्रुटी असतील तर त्यांना मात्र मुंबईत जावे लागणार आहे. हे प्रमाण दिवसाकाठी ३० ते ४० एवढेच आहे. शिवाय, डोंबिवली आणि नवी मुंबई येथेदेखील पासपोर्ट कार्यालयाचे सबडिव्हीजन सुरू होणार आहे.मुंबईत हे कार्यालय गेल्यास सगळ्यांनाच त्याचा त्रास होणार असल्याचे विचारे यांनी नमूद केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहून ठाणे पासपोर्ट कार्यालय सुरू ठेवा, अशी विनंती केल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.