शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

मुंब्य्रात प्रथमच हिवाळी मॅरेथॉन स्पर्धा !

By admin | Updated: January 7, 2016 00:38 IST

पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद

मुंब्रा : पोलिसांच्या पुढाकाराने मुंब्य्रात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हिवाळी मॅरेथोन स्पर्धेतील ६ किलोमीटरचे अंतर पार करून आतिफ इफ्तेखार मोहमद या विद्यार्थ्यांने,तर श्रद्धा पांडे या विद्यार्थिनीने विरल अंतर ३५ मिनिटे १२ सेकंदात पार करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. सहा,चार आणि दोन किलोमीटर अशा तीन गटांत विभागलेल्या या स्पर्धेतील १८ विजेत्यांना पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर आदीच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रशस्तिपत्रके, आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली.येथील विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारचे सुप्त क्रीडा गुण विकसित व्हावेत, त्याच्यातून उदयोन्मुख खेळाडू निर्माण व्हावेत, तसेच इतर शहरातील नागरिकांचा मुंब्य्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या प्रमुख हेतूने पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या निर्देशानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.मुंब्रा-दिव्यातील ५१ शाळा आणि ५ मदरशांमधील २ हजार १४२ विद्यार्थी आणि १ हजार २२६ विद्यार्थिनी असे एकूण तीन हजार ३६८ स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धा व्हावी , यासाठी येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, शाळांचे शिक्षक, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी मोलाचे सहकार्य केले. वरील सर्वाच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन तायडे यांनी त्यांच्या भाषणात केले.या स्पर्धेत सहभागी होता आले नाही, याची खंत वाटत असल्याचे आयुक्त सिंह त्यांच्या भाषणात म्हणाले. स्वर्गीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलेले सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायन यांनी मुंब्य्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी तसेच कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी या भागातील विद्यार्थ्यांनीही पुढे यावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषणात दिली. मुंब्य्रामध्ये विविध प्रकारचे टॅलेंट असलेले तरु ण वास्तव्य करीत आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी, रस्ता हरवलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन उपायुक्त सचिन पाटील यांनी त्यांच्या भाषणात केले.या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आयुष्याच्या स्पर्धेतही यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त प्रतापसिंह पाटणकर यांनी शायरीमधून व्यक्त केले. येथील नागरिकांमध्ये बंधुभाव वाढविणारी ही स्पर्धा होती. असे, पालकमंत्री शिंदे त्यांच्या भाषणात म्हणाले. या स्पर्धेमुळे परिसरातील नागरिकांची मने जुळली, तसेच या स्पर्धेने इतिहास घडवल्याचे आमदार भोईर म्हणाले.