शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

पक्षात राहणार की जाणार?

By admin | Updated: June 26, 2017 01:31 IST

मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे

राजू काळे। लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेल्यांना पक्ष सोडून जाऊ नये, असे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात येत आहेत. याला मान देत राष्ट्रवादी सोडायची की टिकवायची, यासाठी थेट पक्षातील इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठक बोलावली होती. अत्यवस्थ झालेल्या राष्ट्रवादीला तारण्यासाठी जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह प्रदेश पातळीवरील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला टिकवण्यासाठी कंबर कसली. परंतु, त्याची दखल वरीष्ठ पातळीवरून घेतली जात नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांमध्ये रूजू लागली. अनेकदा पक्षबांधणीसाठी पक्षातंर्गत बदलांबाबत सूचना करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या प्रतिसादासाठी अल्टीमेटम दिला. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर राष्ट्रवादी रिकामी होण्याची वेळ येऊन ठेपली. सर्व पदाधिकारी काँग्रेसचा हात पकडण्यासाठी प्रयत्नशील झाले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावतीने झालेल्या इफ्तार पार्टीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत लवकरच काँग्रेसवासी होण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीतील ही अस्वस्थता ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात मांडली. त्यामुळे वरिष्ठांनी त्वरित जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून अंतर्गत बदल्यांसह नवीन नियुक्तयांच्या सूचना मान्य केल्याने तुम्ही पक्ष सोडू नका, अशा आणाभाका घालण्यास सुरूवात केली. परंतु, अनेकदा सूचना करुनही त्याची दखल शेवटच्या क्षणापर्यंत घेतली गेली नाही. यामुळे व्यथित झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडण्याचा निर्धार केला. वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.