शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

धिम्या मार्गावरील बोगद्यानजीकचे खांब हटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:43 IST

मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

ठाणे : मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या धिम्या मार्गावरील बोगद्यानजीक असलेल्या खांबांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने हे खांब हटवून दूर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, मुंब्रा स्टेशन येथील नव्याने होत असलेल्या तीन व चार क्रमांकांच्या फलाटांना जोडणार्‍या पुलाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करुन हा पुल जनतेसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.गेल्या आठवडाभरात धिम्या मार्गावरील दुसर्‍या बोगद्यानजीक असलेल्या खांबांना धडक लागून 4 तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमणा यांच्या नेतृत्वाखाली सलीम खान, रियाझ खान, इक्बाल घाणीवाला, शकील अन्सारी, सय्यद सलीम, रशीद काद्री या शिष्टमंडळाने रेल्वेचे  विभागिय अभियंते एच.एस. चतुर्वेदी आणि कार्यकारी अभियंते रिझवान अहमद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघात रोखण्यासाठी सदरचे खाब हटवण्याची मागणी केली. “सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी जर एखादी गाडी रद्द झाली तर चाकरमानी मिळेल त्या गाडीने प्रवास करीत असतात. यामुळे दरवाजात लटकल्याने खांबावर आदळून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे,” असे शेमणा यांनी निदर्शनास आणून दिले.   त्यावर अहमद यांनी हे खांब हटवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जे ते शक्य झाले नाही तर  रेल्वे रुळांपासून ते दूर उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच, जो पर्यंत हे खांब हटटवण्यात येत नाहीत; तोपर्यंत या खांबानजीकच्या वळणावर ही गाडी हळू चालवण्याच्या सूचना मोटटरमेनला देण्यात येतील, असे सांगितले.दरम्यान. 3 आणि चार क्रमांकाच्या फलाटांचे काम, रेल्वे पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तर, सरकत्या जिन्यांची निविदाप्रक्रियाही सुरु करण्यात आली असल्याचेही अहमद आणि चतुर्वेदी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे