शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

उल्हासनदी किनारीच्या आने गावाचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करणार- आमदार किसन कथोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:46 IST

कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते.

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते. या गावाचे लगतच्याच परिसरात योग्य जागी स्थलांतर करून पुनर्वसन करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.

उल्हासनदी ही कल्याण तालुक्यातील कल्याण नगर या महामार्गावरील रायते, आने, कांबा, वरप व म्हारळ या गावा जवळून वाहत आहे. यामुळे या गावांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा फटका सहन करावा लागतो.  उल्हासनदीला थोडासा पूर आला तरी नदीचे पाणी आने गावात शिरते. यामुळे या गावातील शेतीचे, घरांचे व लोकांच्या इतर सामानाचे दरवर्षी अतोनात नुकसान होत असते. आने गावाची लोकवस्ती जवळ जवळ तीनशेहून अधिक आहे. या गावात ४५  ते ५० घरे आहेत.यावर्षी २६ ,  २७ व २८ जुलै  तसेच ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान उल्हास नदीला पूर आल्याने गावात पूराचे पाणी शिरले होते. वारंवार पावसाळ्यात पूराचे पाणी येत असल्याने नागरिक कमालीचे हतबल झाले आहेत. यंदाच्या पूर स्थितीची पाहणी करत असतांना आमदार किसन कथोरे यांनी या गावाची व्यवस्थीत पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गावच्या स्थलांतराची मागणी कथोरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार या गावाचे  स्थलांतर करण्यासाठी  किसन कथोरे यांनी महसूल प्रशासनास सूचना केल्या आहेत.  लवकरच या बाबतच्या हालचालींना वेग येणार असलयाचे समजते. पूढल्या वर्षीच्या पूराचा सामना न करावा लागणार असल्याने आने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :thaneठाणे